पाटणा प्रतिनिधी :
दि. 15 जुलै 2022
सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार बिहारमध्ये आतंकवादाची पाठशाळा चालवणार्या आणि देशविरोधी कारवाया करणार्या जिहादी गॅंगच्या नुकत्याच मुसक्या आवळण्यात आल्या. या संघटनेला परदेशातून भारतविरोधी अजेंडा चालवणार्या अतिरेकी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात पैश्याचं फंडिंग होत होतं. ही अतिरेकी संघटना PFI शी संबंधित आहे आणि याच PFI वर बंदी घालण्याचा मोदी सरकार विचार करत आहे. ही संघटना 2047 सालापर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या तयारीत होती असं विश्वसनीय सूत्रांकडून समजतं.
यासाठी त्यांनी बिहारच्या पाटणा मधील तरुणांची माथी भडकवून त्यांना या कटात सामील करण्याचा घाट घातला होता. त्यांना प्रशिक्षणही दिलं जात होतं. या जिहादींनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचा कट रचण्यास सुरुवात केली होती. त्याचा अभ्यास, त्याचं प्लॅनिंग सुरू होतं असंही विश्वसनीय सूत्रांकडून समजतं. पण 12 जुलैच्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीच्या काही दिवस आधीच पाटणा पोलिसांनी एका घरावर धाड टाकून अतिरेक्यांची ही आतंकवादी फॅक्टरी उद्ध्वस्त केली.
2047 साली भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल. म्हणून या वर्षी संपूर्ण भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा या जिहादींचा कट होता. त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून हा सर्व खुलासा होतो आहे. या डॉक्युमेंट्समध्ये कधी काय करायचं आहे याची तपशीलवार नोंद आहे. जे 5-6 लोक पकडले गेले आहेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या गॅंगमध्ये जवळ जवळ 26 लोक पाटणा येथे कार्यरत आहेत. या 26 मधले 24 लोक बिहार मधलेच आहेत तर 2 जण कर्नाटकमधून ट्रेनिंगसाठी आले होते.
या डॉक्युमेंटमध्ये स्वच्छपणे लिहिलेलंआढळलं की “आपले चांगल्या प्रकारे प्रशिक्षित ट्रेनर्स PFI च्या मेंबर्सना प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज आहेत. वेपन हॅंडलिंग (शस्त्रे हाताळणे), स्फोटके वापरणे, स्वतःचा बचाव करणे याचं प्रशिक्षण PFI मेंबर्सना देण्यात येईल. पुढे यात हेही लिहिलंय की सुरूवातीला आपल्याला संविधान, तिरंगा, डॉ. आंबेडकर यांच्या नावांचा उपयोग करून वातावरण अशांत करायचंय, हे सांगायचं नाही की आपला खरा उद्देश काय आहे. यांचा फायनल प्लॅन म्हणजे इस्लामिक राष्ट्र स्थापणे आणि शरिया कायदा भारतात लागू करणे हा होता. यात सगळ्यात मोठा अडथळा त्यांना पंतप्रधान मोदी वाटत होते त्यामुळे त्यांनी मोदींना लक्ष्य करण्याचा डाव रचला होता.
याच धर्तीवर तेलंगणाच्या निजामाबादमध्ये दोन दिवसांपूर्वी अगदी असंच मोड्यूल पकडण्यात आलंय. हे मोड्यूल खूप जुनं असल्याचंही सूत्रांचं म्हणणंआहे. इथून तब्बल 200 जणांचं ट्रेनिंग झाल्याचं समजतं आहे.
थोडक्यात म्हणजे इस्लामिक राष्ट्र स्थापन करण्याचा PFI चा कट उघड झाला असून त्यासाठी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींचा अडथळा दूर करण्याचं कारस्थान रचलं जात होतं. या PFI वर केंद्र सरकार बंदी कधी घालणार आणि ती अजूनपर्यंत का घातली नाही अशीच चर्चा सर्वत्र रंगल्याचं चित्र आहे.