दिल्ली प्रतिनिधी :
दि. 19 जुलै 2022
लवकरच केजरीवाल यांचे आवडते अमानतुल्ला खान गजाआड जाण्याची चिन्हे दिसत आहेत असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. सत्येंद्र जैन यांच्यानंतर आता खान हेही जेलवारीच्या मार्गावर आहेत कारण त्यांचाही भ्रष्टाचार आता चव्हाट्यावर आला आहे.
आम आदमी पार्टीचे दिल्लीचे आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरोधात उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. 2016 सालच्या दिल्ली वक्फ बोर्डात नेमणुकीच्या वेळी झालेला घोळ आणि सरकारी तिजोरीला नुकसान पोहोचवण्याच्या संदर्भात हे आदेश असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अमानतुल्ला खान यांच्याबरोबरच वक्फ बोर्डाचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी मेहबूब आलम यांच्याविरोधातही केस दाखल करण्याची सीबीआयला परवानगी देण्यात आली आहे. आरोप असा आहे की या दोघांनी आपापल्या पदांचा दुरुपयोग करून बोर्डात आपल्या संबंधितांची नियुक्ती केली, कारण जेव्हा हा घोळ घातला गेला तेव्हा अमानतुल्ला खान हे बोर्डाचे अध्यक्ष होते. तसेच मेहबूब आलम खान हे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
सूत्रांच्या माहितीनुसार या दोघांनी मिळून यादरम्यानाच सरकारी तिजोरीला मोठं भगदाड पाडलं आणि आपले खिसे भरले. बोर्डाने स्वीकृत आणि गैरस्वीकृत पदांवर मनमानी करून, जाणून बुजून नियमांची पायमल्ली करून आणि हजारो लायक लोकांना डावलून आपल्या सग्यासोयर्यांना रुजू केलं. आता याच भ्रष्टाचाराचा सीबीआय हिशोब करेल. इमानदार सरकारचा ढोल बडवणार्या केजरीवाल यांचं पितळ यामुळे उघडं पडल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.