DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे राजन पाटील अखेर भाजपामध्ये?

बाळराजेंना मिळाला विधान परिषदेचा शब्द?

DD News Marathi by DD News Marathi
July 19, 2022
in राजकीय
0
राष्ट्रवादीचे राजन पाटील अखेर भाजपामध्ये?

सोलापूर प्रतिनिधी :

दि. 19 जुलै 2022

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमटत असलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश अखेर ठरल्याचे वृत्त आहे. येत्या दोन ऑगस्ट रोजी राजन पाटील आपल्या संपूर्ण गटासह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द भाजपकडून देण्यात आल्याची माहिती समोर येते आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा जोरात आहे. विशेषतः अजिंक्यराणा आणि बाळराजे पाटील यांच्या मनात पक्षाबाबत साशंकता निर्माण झाल्याची चिन्हे आहेत. विरोधात बोलणाऱ्या पक्षातील लोकांना वरिष्ठ नेत्यांकडूनच बळ दिले जात असल्याने पाटील गटात नाराजी वाढत चालली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून राजन पाटील व त्यांच्या सुपुत्रांच्या कार्यशैलीचे वाभाडे काढण्याचा एकमेव कार्यक्रम हाती घेतलेला दिसतो आहे. त्यामुळे उमेश पाटलांचा जनता दरबार राजन पाटलांना जाचक ठरू लागला आहे. उमेश पाटील यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांबाबत पक्षनेतृत्वाला सांगूनही ते सुरू राहिल्याने पाटील कुटुंबीय राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर कमालीचे दुखावले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील यांनी साधारण गेल्या पंधरा दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर पोस्ट करून भाजप प्रवेशाचे संकेत दिले असल्याची चर्चा तालुकाभर आहे.

दरम्यान, राजन पाटील आणि कुटुंबीयांचा भाजप प्रवेश आता निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे बाळराजे पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्दही भाजपकडून दिल्याचे समजते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला तीन वेळा पंचवार्षिक आमदार देणारे पाटील कुटुंबीय हे येत्या दोन ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नक्की झाले आहे.

राजन पाटलांच्या हालचालींवर फडणवीसांची नजर?

दरम्यान, मोहोळमधील राजन पाटील यांच्याबाबतच्या घडामोडींकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारीक लक्ष आहे. तालुक्यातील सर्व घटनांची माहिती भाजपचे नेते संजय क्षीरसागर यांच्याकडून घेतली जात आहे. त्याचवेळी क्षीरसागर यांना फडणविसांनी यासंदर्भात आज मुंबईला पाचारण केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.. त्यामुळे येत्या काळात मोहोळमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसल्यास ते आजिबात अनपेक्षित नसेल.

दरम्यान, भाजप प्रवेशाची अफवा असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत कायम राहू, असे मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले. सत्तेचं काय? ती जात येत असते पण आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. आम्ही एका विचाराने प्रेरित झालेलो आहोत. त्यामुळे जिकडे सत्ता तिकडे आम्ही असे आजिबात नाही. आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची केवळ अफवा आहे. तशी वेळ आल्यास आम्ही सर्वप्रथम मतदारांना सांगू. सध्या माध्यमांमधून भाजप प्रवेशाच्या बाबतीत केवळ अफवा पसरवल्या जात आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BJP#Mohol#NCP#RajanPatil#VikrantPatil
Previous Post

केजरीवाल यांचे आवडते अमानतुल्ला खान सीबीआयच्या कचाट्यात?

Next Post

शरद पवारांनी डाव साधून शिवसेना फोडली – रामदास कदम

Next Post
शरद पवारांनी डाव साधून शिवसेना फोडली – रामदास कदम

शरद पवारांनी डाव साधून शिवसेना फोडली - रामदास कदम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.