नवी दिल्ली :
दि. 21 जुलै 2022
खासदारांच्या एकूण 748 मतांपैकी मुर्मू यांना 540 मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांना फक्त 208 मते मिळाली आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. रायसीना हिल्सच्या रेसमध्ये खासदारांची सर्वाधिक मते घेऊन द्रौपदी मुर्मू या आघाडीवर आहेत. आता राज्यांमधील आमदारांची मतमोजणी सुरु होत आहे. यामध्येही मुर्मू या आघाडीवर असतील का , याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत आहे. सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या आघाडीवर आहेत. 15 खासदारांची मते बाद ठरली आहेत. खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे आणि आता आमदारांच्या मतांची मोजणी सुरू आहे.