पुणे प्रतिनिधी :
दि. 03 ऑगस्ट 2022
टाकळी हाजी ग्रामपंचायत 2022-2027 च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘मळगंगा ग्रामविकास पॅनल’चा विजय निश्चित असल्याचे दिसत आहे. गावात फेरफटका मारला असता येथील सर्वप्रिय नेते मा. दामूआण्णा घोडे हे असल्याचे समजले. जमिनीवर पाय ठेऊन सर्वात मिसळणारं, दिलदार आणि दानत असलेलं असं नेतृत्व म्हणजे दामूआण्णा अशी त्यांची प्रतिमा जनमानसात आहे.
समाजकार्यातून दामूआण्णा यांनी राजकारणाचा श्रीगणेशा करून पहिल्याच प्रयत्नात मोठा विजय मिळविला. त्यानंतर त्यांनी दहा वर्ष टाकळी हाजी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिलं आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अरुणा घोडे यांनीही ५ वर्ष ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ५ वर्ष पंचायत समितीच्या सदस्या म्हणून काम पाहिले आहे.
भिल्ल वस्तीसाठीही दामूआण्णा यांनी झटून काम केले आहे. संपूर्ण गावात तसेच भिल्ल वस्ती येथे त्यांनी बरीच विकासकामे केली आहेत. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारे आणि सर्वांचा सर्वांगीण विकास हे आपले उद्दीष्ट मानणारे दामूआण्णा यांना जनतेचा विशेष पाठिंबा आहे. त्यांनी विशेष प्रयत्न करून नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून कुकडी नदीवर जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘कुंड’ येथे विविध विकासकामे साकारली आहेत. त्यामुळे आज या परिसराला पर्यटन क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
गावाच्या विकासाची कामे त्यांनी त्यांच्या ‘मळगंगा ग्रामविकास पॅनल’च्या माध्यमातून केली आहेत. दामूआण्णा येत्या ग्रामपंचायत पंचवार्षिक 2022 च्या निवडणुकीत आपल्या ‘मळगंगा पॅनलच्या’ माध्यमातून आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाले आहेत. त्यांना व त्यांच्या ‘मळगंगा ग्रामविकास पॅनल’च्या सर्व उमेदवारांना गावकरी आपली पसंती देतील असे आमच्या प्रतींनिधीने केलेल्या पाहाणीवरून समजले.