DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अशी आहे पुण्याची प्रसिद्ध पर्वती!

२३ एप्रिल १७४९ ला साकारले देवदेवेश्वर मंदिर

DD News Marathi by DD News Marathi
September 17, 2022
in महाराष्ट्र
0
अशी आहे पुण्याची प्रसिद्ध पर्वती!

पुणे प्रतिनिधी :

दि. १७ सप्टेंबर २०२२

जाणून घ्या पुण्यातील पर्वती टेकडीविषयी!
पुण्यातील अनेक ऐतिहासिक स्थळांपैकी एक असलेली ही एक टेकडी. पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. या टेकडीवर बरेच पुणेकर सकाळ संध्याकाळ व्यायामासाठी येतात. पर्वतीला एकूण 103 पायर्‍या आहेत, ज्या भव्य अश्या नौबतखान्याजवळ येऊन थांबतात. या टेकडीवर आपल्याला पेशवे संग्रहालय पाहायला मिळते. याशिवाय इथे आणखी चार मंदिरं आणि श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची समाधीही आपल्याला दिसते.

पानीपतच्या तिसर्‍या युद्धाच्या आधीपर्यंत ही पर्वती टेकडी पेशव्यांच्या फेरफटका मारण्याची तसेच आराम करण्याची जागा होती. सध्या या जागेची देखभाल श्री देवदेवेश्वर संस्थांनातर्फे केली जाते. पर्वती परिसरात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.
पेशवे संग्रहालयात प्रवेश करण्यासाठी रु. 10 चे नाममात्र शुल्क आकारले जाते. पेशवेकालीन वास्तूची प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. या संग्रहालयात पेशवेकालीन वस्तु आणि छायाचित्रांचा उत्तम संग्रह पाहायला मिळतो. इथे जवळ जवळ सर्व पेशव्यांची छायाचित्रे लावलेली आहेत.
दुसर्‍या मजल्यावर समोरच लाकडामध्ये कोरलेली गणपतीची मूर्ती आणि मखर आहे. त्या काळातल्या मुद्रा, नाणी तसेच वस्तूंचा संग्रह याठिकाणी आहे. या वस्तू पाहून आपल्याला पेशव्यांच्या समृद्धीचा, श्रीमंतीचा अंदाज येऊ शकतो.
संग्रहालयाच्या मागील बाजूस श्रीमंत नानासाहेब पेशव्यांची समाधी आहे. येथेच नानासाहेबांनी आपला अखेरचा श्वास घेतला. समोरच नानासाहेब पेशव्यांची तसबीर ठेवलेली दिसते.

आता आपण पर्वती टेकडीवरील देवदेवेश्वर मंदिराविषयी जाणून घेऊया!
छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज आणि श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे घनिष्ट संबंध होते. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांना अतीव दुःख झाले. त्यांनी छत्रपती शाहूंच्या खडावा आणि भगवान शिव यांची मूर्ती सातार्‍याहून इथे आणल्या. खडावा नानासाहेबांच्या समाधीस्थळापाशी ठेवण्यात आल्या आहेत आणि भगवान शंकरांच्या मूर्तीची स्थापना येथील देवदेवेश्वर मंदिरात केली आहे. श्रीमंत नानासाहेबांनी आपल्या आई काशीबाई यांचा नवस पूर्ण करण्यासाठी या मंदिराची स्थापना केली. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील यांच्या कडून जमीन घेऊन देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले. २३ एप्रिल, इ.स. १७४९ रोजी हे मंदिर उभे राहिले. काशीबाईंचा डावा पाय दुखावलेला होता. तो बरा होण्यासाठी त्यांनी हा नवस बोलला होता. कार्तिक महिन्यातील त्रिपुरीपौर्णिमेदिवशी म्हणजे नोव्हेंबरमध्ये दर्शनासाठी येथे गर्दी होते. तसेच श्रावणात सोमवारी या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. 22 मार्च व 23 सप्टेंबरला सूर्यकिरणे येथील पिंडीवर अगदी काही काळापुरती पडतात. हे दृश्य पाहाण्यासाठीही बरीच गर्दी होते.
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या.

मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपऱ्यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय), गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत. इस १७६६ मध्ये माधवराव पेशव्यांनी शिव पंचायतन विकसित केले, ज्याच्यात ही चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो. मंदिरात भगवान शंकर, पार्वती आणि गणेश यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. त्या तीन मूर्ती १७४९ मध्ये मुळात सोन्याच्या बनवलेल्या होत्या; १९३२ मध्ये त्या चोरीला गेल्या व त्याजागी त्याच्या हुबेहूब दुसऱ्या अन्य धातूच्या मूर्ती ठेवल्या गेल्या. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. तिथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे.

पर्वती टेकडीवरून पुण्याचे मनोहारी दृश्य पाहाणे, शहराचे वेगवेगळे भाग ओळखण्याचा प्रयत्न करणे हेसुद्धा मनाला आनंद देणारे ठरते. इथून समोरच झाडांच्या मधून सारसबागेतील गणेश मंदिर दृष्टीस पडते. या टेकडीवरून महानगरपालिका भवनासामोरील डौलाने फडकणारा आपला राष्ट्रध्वज, नेहरू स्टेडीयम, स्वारगेट फ्लायओव्हर तसेच शहरातील विविध भाग पाहाता येतात.

पुण्यात आपण आल्यावर पर्वतीला भेट दिल्याशिवाय आपली पुणे भेट अर्धवट राहिल्यासारखे आपल्याला वाटल्यावाचून राहाणार नाही.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

410 कोटींमध्ये बनलेला ‘ब्रह्मास्त्र’ फ्लॉप? रेकॉर्डब्रेक कमाईचे दावे खोटे?

Next Post

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या घरी!

Next Post
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या घरी!

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

कल्याणी समुहातील वरिष्ठ अकाऊंटंटचे चाकणच्या हॉटेलातआत्महत्त्या प्रकरण!

July 31, 2025
चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

चांपा-हळदगाव-खापरी रस्ता दुरुस्तीसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको!

July 31, 2025
नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

July 30, 2025
एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

July 29, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.