DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

दिशा सलियन खून प्रकरणात राणेंनी घेतले आदित्य ठाकरेंचे नाव

यापूर्वी थेट नाव घेतले नव्हते. आज मात्र गौप्यस्फोट केला

DD News Marathi by DD News Marathi
October 7, 2022
in राजकीय
0
दिशा सलियन खून प्रकरणात राणेंनी घेतले आदित्य ठाकरेंचे नाव

मुंबई प्रतिनिधी :

दि. 07 ओक्टोबर 2022

मुंबई : मॉडेल दिशा सलियन मृत्यू प्रकरणात, जी आत्महत्त्या दाखवली गेली होती, त्यात माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचे बोलले जात असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केला. आता त्यांचे सरकार नाही. आमचे सरकार आहे. त्यामुळे आता चौकशी होणारच असा इशाराही राणे यांनी दिला.

या प्रकरणात यापूर्वी मी थेट नाव घेतले नव्हते. मात्र, आज थेट नाव घेत आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. खासगीत बरेचजण बोलत असून आता जर का या प्रकरणाची चौकशी केली तर सर्वकाही बाहेर येईल, असे राणे म्हणाले. मॉडेल दिशा सलियन प्रकरणात नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्याकडून गेल्या एक-दीड वर्षभरापासून अप्रत्यक्षपणे वारंवार आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात येत होते. मात्र, आज प्रथमच राणे यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव जाहीरपणे घेतले आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतेवेळी राणे यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. मला मारण्यासाठी छोटा शकील व राजन टोळीला उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती असा आणखी एक गंभीर आरोप राणे यांनी केला. याला मारायला लाव. त्याचे घर जाळ या पलिकडे उद्धव ठाकरे यांनी केले तरी काय? असा सवलाही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंचे योगदान काय असा प्रश्‍न राणे यांनी विचारला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासारख्या नेत्यांवर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही अशी घणाघाती टिप्पणी त्यांनी केली. ज्यांनी अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात अडीच तासदेखील काम केले नाही, त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर टीका करणे शोभते काय, असा खोचक प्रश्न राणे यांनी केला. या पुढच्या काळात अशी टीका आम्ही अजिबात सहन करणार नाही. ते असेच बोलत राहिले तर राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AdityaThakare#DishaSaliyan#NarayanRane
Previous Post

अखेर PFI वर पाच वर्षांसाठी बंदी. गृहमंत्रालयाचा अध्यादेश.

Next Post

अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गट उमेदवारच देणार नाही, तरीही चिन्हासाठी घाई का? शिवसेनेचा आयोगापुढे दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.