बारामती प्रतीनिधी :
दि. 12 डिसेंबर 2022
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुका येत्या 18 डिसेंबर 2022 रोजी होऊ घातल्या आहेत. यात खासकरून मोरगावमधील निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये ‘श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनल’चा दबदबा सर्वत्र दिसून येत आहे. इथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होते आहे. ‘श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनल’च्या उच्चशिक्षित उमेदवार रोहिणी संदिप ढोले या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. त्यांचेबरोबर अलका पोपट तावरे आणि ललिता बाळकृष्ण तावरे या दोन प्रतिस्पर्धी आहेत.
गावात फेरफटका मारला असता रोहिणी संदिप ढोले यांनाच सरपंच म्हणून ग्रामस्थांची पसंती असल्याचे दिसले. त्यांच्या पॅनलचा लौकिक, त्यांच्या पॅनलने आत्तापर्यंत केलेली विकासकामे यांचा सकारात्मक परिणाम सर्वत्र आहे. स्वतः रोहिणी संदिप ढोले या उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांची एक वेगळी प्रतिमा ग्रामस्थांमध्ये आहे. त्या प्रत्येक गोष्टीला विचारपूर्वक न्याय देऊ शकतील, शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत परिणामकारकरित्या पोचविण्यात त्या यशस्वी होतील असा ग्रामस्थांना विश्वास आहे. गावाच्या विकासासाठीचे त्यांचे व्हीजन अतिशय विशाल आहे आणि त्यातील नमूद केलेली कामे पूर्ण करण्याची त्यांची क्षमता आहे असे ग्रामस्थांशी बोलताना समजले. तीर्थक्षेत्र मोरगाव हे ‘ब’ वर्गातून ‘अ’ वर्गात आणण्याचा त्यांचा निर्धार त्या नक्की यशस्वी करतील असाही ग्रामस्थांना विश्वास आहे. सरपंच म्हणून आपल्या पदाचा त्या चांगल्या प्रकारे गावाच्या कल्याणासाठी उपयोग करतील अशी खात्री त्यांना आहे. या सर्व गोष्टींमुळे दिवसेंदिवस ‘श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनल’ला मिळणारा वाढता पाठिंबा पाहता या पॅनलच्या इतर अकरा उमेदवारांनाही भरघोस यश मिळेल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत रोहिणी संदिप ढोले या खात्रीलायकरित्या विजयी होतील असा ठाम विश्वास ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळतो.