डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. 14 डिसेंबर 2022
येत्या 18 डिसेंबरला विविध ठिकाणी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका संपन्न होत आहेत. आव्हाळवाडी येथील निवडणुकीबाबत यात सर्वात जास्त उत्सुकता दिसून येत आहे. इथे वॉर्ड क्र. 2 मधील लढत विशेष रंगणार आहे. पण वॉर्डमधील ग्रामस्थांचा एकंदर कल बघता काकासाहेब रामराव सातव, सारिका मारुती सातव आणि सविता तनाजी सातव यांना भरघोस मते मिळून त्यांचा विजय निश्चित होणार असे चित्र पाहायला मिळते.
ग्रामस्थांशी चर्चा केली असता काकासाहेब सातव आणि त्यांच्याबरोबरील इतर दोन महिला उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार त्यांनी केल्याचे स्पष्ट जाणवते. काकासाहेब सातव यांनी आत्तापर्यंत वॉर्डसाठी केलेल्या विविध कामांची जाण ग्रामस्थांना आहे. ग्रामस्थांनी संगितले की ज्या व्यक्तीने गावातील रस्ते चांगले केले, ड्रेनेज लाईन टाकून गावात स्वच्छता आणण्याचा प्रयत्न केला, जिल्हा परिषदेची नवी इमारत सर्वांच्या सहकार्याने बांधली आणि इतरही लोकोपयोगी बरीच कामे केली, त्या व्यक्तीलाच आम्ही निवडून देणार. गावाचं हित कोण जपतं ते आम्ही जाणून आहोत असे काही ग्रामस्थांनी परखडपणे संगितले.
गावाच्या उन्नतीसाठी काकासाहेबांनी केलेल्या सर्व गोष्टी डोळ्यांसमोर असल्याने आमची या तिघांनाच पसंती आहे असे सारे एकसुरात बोलत आहेत. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी, संबंधितांकडे विविध लोकोपयोगी गोष्टींसाठी पाठपुरावा करण्यासाठी, त्यांची पूर्तता करण्यासाठी हे उमेदवारच सक्षम आहेत असा पूर्ण विश्वास सारे व्यक्त करीत आहेत. सर्वत्र याबाबतच चर्चा सुरू आहे. काकासाहेब रामराव सातव यांच्या नेतृत्त्वावर आणि कार्यक्षमतेवर ग्रामस्थांचा जो विश्वास जाणवला त्यावरून वॉर्ड क्र. 2 मधून ते स्वतः तसेच सारिका मारुती सातव आणि सविता तनाजी सातव यांचा विजय निश्चितच होणार असे दिसते आहे.