हवेली प्रतिनिधी :
दि. १५ डिसेंबर २०२२
येत्या १८ डिसेंबरला विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होत आहेत. कदमवाकवस्ती पंचवार्षिक सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी आगळाच उत्साह दिसून येत आहे. २०१७ ते २०२२ दरम्यान इथे ‘नवपरिवर्तन पॅनल’च्या गौरी चित्तरंजन (नाना) गायकवाड या सरपंच असताना गावाने लक्षणीय प्रगती केल्याचे ग्रामस्थ एकसुरात बोलतात. त्यांना चित्तरंजन नाना गायकवाड यांचे बहुमूल्य आणि अनुभवी मार्गदर्शन लाभले होते. आता याच पॅनलकडून स्वतः चित्तरंजन (नाना) त्रिंबक गायकवाड हे सरपंचपदासाठी निवडणूक लढवित आहेत. ग्रामस्थांशी आम्ही संवाद साधला असता, या निवडणुकीत गौरीताई चित्तरंजन गायकवाड यांनी केलेली भरघोस विकासकामे, नवपरिवर्तन पॅनलकडे विजयश्री खेचून आणणार असल्याचे ग्रामस्थ ठामपणे सांगतात. बहुचर्चित आणि कदमवाकवस्तीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी तब्बल ९० कोटींची पाणीपुरवठा योजना गौरीताईंनी यशस्वीपणे मंजूर करून घेतली आहे. इतकेच नव्हे तर तिचे कामही आता सुरू झाले आहे असे ग्रामस्थ सांगतात. गावाची अशी आपलेपणाने काळजी घेणार्या, ग्रामस्थांना जास्तीत जास्त सुखसोयी प्रदान करणार्या नवपरिवर्तन पॅनलच्या चित्तरंजन (नाना) गायकवाड यांना आणि त्यांच्या पॅनलला निवडून देणे आमचे कर्तव्य आहे असे बहुतांशी ग्रामस्थांनी एकसुरात संगितले.
या सर्व चर्चेतून आणि ग्रामस्थांची कृतज्ञतेची भावना लक्षात घेता येत्या कदमवाकवस्ती पंचवार्षिक सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच म्हणून चित्तरंजन त्रिंबक गायकवाड आणि त्यांचे ‘नवपरिवर्तन पॅनल’ यांचा विजय निश्चित असल्याचेच चित्र सर्वत्र आहे.