हवेली प्रतिनिधी :
दि. 15 डिसेंबर 2022
अहिरेगावात येत्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी आरती युवराज वांजळे या निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने गावात फेरफटका मारला असता वातावरण त्यांना बरेच अनुकूल असल्याचे दिसून आले. त्यांचे पती युवराज वांजळे यांनी यापूर्वी सरपंच म्हणून गावाची उन्नती केलेली आहे ही आरती युवराज वांजळे यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
युवराज वांजळे यांनी सरपंच या नात्याने अहिरेगावाचा बराच विकास साधला आहे असे ग्रामस्थांकडून समजले. आरओ फिल्टर कार्यान्वित करून जसे त्यांनी ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून दिले तसेच इलेक्ट्रिक पोल, डीपीची कामे करून गावाचा विजेचा प्रश्न सोडविला. पिठाच्या गिरणीची सुरुवात करून ग्रामस्थांना भेडसावणारा दैनंदिन आयुष्यातला प्रश्न त्यांनी सोडवला. अश्या उल्लेखनीय कामांमुळे युवराज वांजळे यांचे आपुलकीचे नाते ग्रामस्थांबरोबर निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात वाटचाल केलेल्या आणि त्यांचाच पाठिंबा लाभलेल्या आरती युवराज वांजळे त्यामुळेच सरपंचपदाच्या भक्कम दावेदार मानल्या जात आहेत. ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दलही सकारात्मक मते असल्याचे चित्र दिसून आले. आपल्या पतीच्याच पावलावर पाऊल टाकून त्या वाटचाल करतील आणि गावाचा उत्कर्ष असाच अबाधित राखतील असे प्रांजळ मत ग्रामस्थांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान नोंदवले. मुळात तुमचा उद्देश चांगला असेल तर ग्रामस्थांच्या ते आपोआप लक्षात येते असे युवराज वांजळे आणि अर्थातच आरती युवराज वांजळे यांचे तत्त्व आहे असे गावकरीच आपलेपणाने नमूद करताना दिसले.