हवेली प्रतिनिधी :
दि. 15 डिसेंबर 2022
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका येत्या 18 डिसेंबरला होऊ घातल्या आहेत. सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या तापलेल्या वातावरणात आता एका कॉल ऑडिओ रेकॉर्डिंगने खळबळ माजवली आहे. सध्या हे कॅाल रेकॅार्डिंग गावात चर्चेचा विषय ठरला आहे. कदमवाकवस्तीचे सरपंच गौरी गायकवाड यांच्याविषयी या कॅाल रेकॅार्डिंगमध्ये उल्लेख असल्याने त्यांना मारहाण हा सुद्धा एक कट होता अशी आता चर्चा रंगू लागली आहे. जनसेवा पॅनलच्या प्रमुखांपैकी एकाचा हा कॅाल असल्याचे नागरिक बोलत आहेत त्यामूळे ऐन निवडणूकीत जनसेवा पॅनल बॅकफुटवर आले आहे.
अतिशय गलिच्छ आणि समग्र स्त्रीजातीचा अपमान करणारा हा ऑडिओ ऐकतानाही लाज वाटते, त्यामुळे त्यातील तपशील आम्ही इथे नमूद करू शकत नाही. पण हे ऑडिओ रेकॉर्डिंग जनसेवा पॅनल प्रमुखांपैकी एका प्रमुखाचे असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. हा व्यक्ती सध्या एका वॅार्डमधून जनसेवा पॅनलचा उमेदवार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, हा कॅाल कोरोनाच्या आधीचा असल्याचे दिसून येतेय.
नवपरिवर्तन पॅनल आणि जनसेवा पॅनल यांच्यात नेहमीच राजकीय वर्चस्वासाठी कदमवाकवस्तीमध्ये चुरस राहिली आहे. अशी राजकीय चुरस ही निकोप आणि सकारात्मक असावी असा सर्वमान्य संकेत आहे. पण हा ऑडिओ ऐकल्यानंतर ऐकणार्यांच्या तळापायांची आग मस्तकात जाते आहे. कुणीही या अश्लील, गलिच्छ आणि किळसवाण्या प्रकारला पाठीशी घालत नाहीये. आज हे कॅाल रेकॅार्डिंग अनेकांच्या व्हाट्सअप आणि मोबाईलवर व्हायरल होत आहे.
कदमवाकवस्तीतील महिलांमध्ये तर कमालीचा रोष दिसून येतो आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे, सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड यांना कोरोना काळात काही समाजकंटक आणि समाजाच्या दृष्टीने घातक लोकांकडून मारहाण झाली होती. ही मारहाण पूर्वनियोजित असल्याचे या ऑडिओमधून स्पष्ट होते आहे. तद्दन किळसवाणा आणि ओंगळ असा हा ऑडिओ ऐकून राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे, हे दिसून येते. एका महिलेचा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन अपमान करणारे गावाचा विकास करणे केवळ अशक्य आहे असाच ग्रामस्थांचा सूर आहे. ऐन ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावर ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने या निवडणुक वेगळ्या वळणावर जाऊन पोहचल्याचे दिसून येत आहे.
टिपः डीडी न्युज मराठी या आवाजाची पुष्टी करत नाही
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]