हवेली प्रतिनिधी :
दि. 15 डिसेंबर 2022
पेरणे गावात येत्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी रिंगणात असलेल्या उषाताई दशरथ वाळके या श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार भरघोस मते मिळवतील असे ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेतून जाणवले.
“उद्देश चांगला तर यश निश्चित” असे ज्या उषाताईंचे अभिमानाने सांगणे असते त्या गावासाठी नक्कीच चांगली कामगिरी करतील असा ग्रामस्थांचा विश्वास आहे. त्यांच्या श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलने आत्तापर्यंत गावासाठी बरीच महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. या पॅनलच्या सरपंच रूपेश चंद्रकांत ठोंबरे यांनी 2017 ते 2022 या काळात गावासाठी बरीच उल्लेखनीय कामे केली आहेत. गावातील स्वच्छतेच्या, सुरक्षिततेच्या व प्रसन्न वातावरणाच्या दृष्टीने अनेक कामे त्यांनी केली व गावाचा सर्वांगीण विकास केला. यात विविध ठिकाणांचे सुशोभीकरण, रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, स्ट्रीट लाईट्स, गटारांची कामे इ. आवश्यक कामे श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत झाली आहेत. पॅनलच्या याच परंपरेला अनुसरून उषाताईंची वाटचाल असेल असा ग्रामस्थांना विश्वास आहे.
सरपंच रूपेश ठोंबरे यांच्या नेतृत्त्वात या पॅनलने आजपर्यंत केलेल्या सर्वसमावेशक कामांची पुण्याई उषाताईंना विजय मिळवून देईल असे एकंदर चित्र पेरणे गावात पाहायला मिळाले. ग्रामस्थांशी झालेल्या बोलण्यातून त्यांनी उषा दशरथ वाळके यांना निवडून देण्याचा निर्धार केल्याचे जाणवले. उषाताईंच्या सरपंचपदी विराजमान होण्याने पेरणे गावाचा विकास अधिक जोमाने आणि अखंडपणे चालू राहील असा ग्रामस्थांना विश्वास आहे.