हवेली प्रतिनिधी :
दि. 16 डिसेंबर 2022
पती युवराज वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिरेगावात येत्या ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी आरती युवराज वांजळे या निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने गावात फेरफटका मारला असता ग्रामस्थांचा कल त्यांच्याकडेच असल्याचे दिसून आले. सरपंच या नात्याने युवराज वांजळे यांनी अहिरेगावाचा बराच विकास यापूर्वी साधलाआहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता आरती युवराज वांजळे सरपंच म्हणून निवडणूक लढवित आहेत. युवराज वांजळे यांच्या लोकप्रियतेचा आणि त्यांच्या कामांचा फायदा आरताईताईंना होणार असे ग्रामस्थ बोलतात.
ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी युवराज वांजळे यांनी आरओ फिल्टर कार्यान्वित केला. तसेच इलेक्ट्रिक पोल, डीपीची कामे करून गावाचा विजेचा प्रश्न सोडविला. पिठाच्या गिरणीची सुरुवात करून ग्रामस्थांना भेडसावणारा दैनंदिन आयुष्यातला प्रश्न त्यांनी सोडवला. युवराज वांजळे यांचे आपुलकीचे नाते ग्रामस्थांबरोबर निर्माण झाल्याने त्यांच्याच मार्गावर चालणार्या आरती युवराज वांजळे यांना ग्रामस्थांचा भरपूर पाठिंबा असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. अहिरेगावाचा विकास जर निश्चित कारायचा असेल तर आरती युवराज वांजळे सरपंचपदासाठी उत्तम पर्याय आहेत असाच ग्रामस्थांचा एकंदरीत सूर आहे. ग्रामस्थांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान, त्या आपल्या पतीच्याच पावलावर पाऊल टाकून वाटचाल करतील आणि गावाचा उत्कर्ष असाच अबाधित राखतील, असे स्पष्ट मत नोंदवले. स्व. आमदार रमेश वांजळे यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच प्रेरणेने अहिरेगावाच्या कल्याणासाठी आरतीताई भरभक्कम कामगिरी करतील अशी पक्की खात्री सर्वांना आहे. उद्देश चांगला तर यश आपलेच असे म्हणणार्या आरतीताईच विजयी होतील असे बहुसंख्य ग्रामस्थांचचे मत आहे.