DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मोरगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत रोहिणी संदिप ढोले (कदम) यांना वाढता पाठिंबा

ग्रामस्थांना पाहिजे सुशिक्षित सरपंच

DD News Marathi by DD News Marathi
December 16, 2022
in राजकीय
0
मोरगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या तिरंगी लढतीत रोहिणी संदिप ढोले (कदम) मारणार बाजी

बारामती प्रतिनिधी :
दि. 16 डिसेंबर 2022

येत्या 18 डिसेंबरला विविध ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका जरी संपन्न होत असल्या तरी यात सर्वात जास्त उत्सुकता ताणली गेली आहे ती मोरगाव येथील निवडणुकीबद्दल. इथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनलच्या उच्चशिक्षित उमेदवार रोहिणी संदिप ढोले (कदम) यांच्याबरोबर इतर दोन पॅनलच्या अलका पोपट तावरे आणि ललिता बाळकृष्ण तावरे या सरपंचपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.
ग्रामस्थांशी चर्चा केली असता समजले की सुशिक्षित उमेदवारच त्यांना गावाची जबाबदारी घेण्यासाठी पाहिजे आहे. म्हणूनच श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनलच्या उमेदवार रोहिणी संदिप ढोले (कदम) यांना सर्वांची पसंती असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरपंचपदासाठी या पॅनलच्या उमेदवार असलेल्या रोहिणी संदिप ढोले (कदम) या उच्चशिक्षित असल्याने आमची त्यांनाच पसंती आहे असे सारे एकसुरात बोलत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या योजना लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी, विविध कारणांस्तव शासनदरबारी हुशारीने पाठपुरावा करण्यासाठी रोहिणीताईच सरपंचपदासाठी योग्य उमेदवार आहेत असे मोरगावचे सर्व वयातील मतदार सांगतात . तसेच श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनल हेच गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणेल असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करतात. गेली २५ वर्षे पंचायत सदस्य असलेले श्री विघ्नहर्ता सर्वधर्म विकास पॅनलचे मा. सरपंच दत्तात्रय (आण्णा) ढोले यांचा तीर्थक्षेत्र मोरगावला ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात आणण्यासाठी सिंहाचा वाटा होता. त्यामुळे आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रोहिणी संदिप ढोले (कदम) या मोरगाव तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्गातून ‘अ’ वर्गात घेऊन येतील असे ग्रामस्थांना ठामपणे वाटते. त्यामुळे मोरगावच्या सरपंचपदी यावेळी रोहिणी संदिप ढोले (कदम) याच विराजमान होतील असे चित्र दिसून येत आहे.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #MorgaonGramapanchaayat
Previous Post

अहिरेगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदासाठी आरती युवराज वांजळे यांचे पारडे जड

Next Post

आव्हाळवाडी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत काकासाहेब रामराव सातव यांना ग्रामस्थांची पहिली पसंती

Next Post
आव्हाळवाडी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत काकासाहेब रामराव सातव आणि त्यांच्या सहकार्‍यांचा बोलबाला

आव्हाळवाडी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत काकासाहेब रामराव सातव यांना ग्रामस्थांची पहिली पसंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

संजय राऊत जेलची हवा विसरलेत असं दिसतंय!

February 17, 2026
‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

‘धुरंधर 2’च्या टीमवर मोठ्या कारवाईची टांगती तलवार!

February 17, 2026
“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

“लोढा साहेबांच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासा” रोहित पवारांची मागणी!

February 17, 2026
झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

झिरवळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा सवाल!

February 17, 2026
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.