बारामती प्रतिनिधी :
दि. 16 डिसेंबर 2022
येत्या 18 डिसेंबरला विविध ठिकाणी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका ज्या संपन्न होत आहेत त्यामध्ये आव्हाळवाडी येथील निवडणुकीबाबतचा मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येतो आहे. यात वॉर्ड क्र. 2 मधील लढतीबाबत चित्र स्पष्ट होत चालले आहे. या वॉर्डमधील ग्रामस्थांशी बोलणी केली असता काकासाहेब रामराव सातव, सारिका मारुती सातव आणि सविता तनाजी सातव यांना भरघोस मते मिळून त्यांचा विजय निश्चित होणार असे चित्र पाहायला मिळाले.
ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेत त्यांनी काकासाहेब सातव आणि त्यांच्याबरोबरील इतर दोन महिला उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. काकासाहेब सातव यांनी आत्तापर्यंत वॉर्डसाठी केलेली विविध कामे त्यांना सहजपणे विजय मिळवून देतील असे एकंदर चित्र आहे. ज्या व्यक्तीने गावातील रस्ते चांगले केले, ड्रेनेज लाईन टाकून गावात स्वच्छता आणण्याचा प्रयत्न केला, जिल्हा परिषदेची नवी इमारत सर्वांच्या सहकार्याने बांधली आणि इतरही लोकोपयोगी बरीच कामे केली, त्या व्यक्तीलाच आम्ही निवडून देणार असा ग्रामस्थांचा निर्धार आहे. गावाचं हित जपणार्यांच्याच पाठीशी आम्ही उभे राहाणार अशी कृतज्ञतेची भावना ते व्यक्त करतात.
आव्हाळवाडी गावाच्या उन्नतीसाठी काकासाहेबांनी केलेली कामे हा कळीचा मुद्दा या निवडणुकीत ठरणार आहे, ज्यामुळे विरोधी गटामध्ये थोडे काळजीचे वातावरण आहे. सर्व गोष्टी डोळ्यांसमोर असल्याने आमची या तिघांनाच पसंती आहे असे ग्रामस्थ ठामपणे बोलत आहेत. शासनाच्या सर्वसामान्यांसाठीच्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी हे उमेदवारच प्रामाणिकपणे काम करतील असा विश्वास सार्या ग्रामस्थांना आहे. काकासाहेब रामराव सातव यांच्या नेतृत्त्वावर, गावाबद्दल त्यांना असलेल्या प्रेमावर आणि कार्यक्षमतेवर ग्रामस्थांचा अढळ विश्वास आहे असे या भेटीदारम्यान पावलोपावली जाणवत होते. त्यामुळे वॉर्ड क्र. 2 मधून त्यांच्यासह’ सारिका मारुती सातव आणि सविता तनाजी सातव यांचा विजय निश्चितच होणार असे स्पष्ट दिसते आहे.