बारामती प्रतिनिधी :
दि. 17 डिसेंबर 2022
येत्या 18 डिसेंबरला विविध ठिकाणी संपन्न होणार्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोरगाव येथील परिस्थितीचा अंदाज घेतला असता सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत रोहिणी संदिप ढोले (कदम) या बाजी मारणार असे दिसते आहे. गावाचा एकंदरीत सूर पाहाता त्यांच्या श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनलचा सर्वत्र दबदबा असल्याचे चित्र समोर आले.
इथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत असली तरी श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनलच्या उच्चशिक्षित उमेदवार रोहिणी संदिप ढोले (कदम) यांना बहुसंख्य ग्रामस्थांची पसंती असल्याचे दिसले. मुळात ग्रामस्थांना सुशिक्षित व्यक्तीने सरपंचपदी विराजमान व्हावे असे वाटते आहे. असेही समजले की ग्रामस्थांच्या आग्रहाखातरच रोहिणी संदिप ढोले (कदम) या निवडणुकीत सामील झाल्या आहेत. हा मुद्दा जर ग्राह्य मानला तर त्यांचा विजय आत्ताच निश्चित झाला आहे असे म्हणावे लागेल. शिवाय त्या उच्चशिक्षित असल्याने त्यांचा एक वेगळाच पगडा जनमानसावर आहे. ग्रामस्थांशी चर्चा केली असता श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनललाच सर्वांची पसंती असल्याचे चित्र पाहायला मिळाले. लोककल्याणाची विविध कामे त्या सकारात्मकतेने आणि परिणामकारकपणे मार्गी लावतील असा ग्रामस्थांना विश्वास आहे. शासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा आणि विधायक दुवा त्या ठरतील असे ग्रामस्थ बोलताना दिसले. ग्रामस्थांनी सरपंचपदासाठी सुशिक्षित उमेदवारालाच निवडून देण्याचा निर्धार केला आहे. तसेच श्री विघ्नहर्ता सर्वधर्म पॅनलचा, लोककल्याण करणारे पॅनल, असा ग्रामस्थांवर पगडा आहे. गेली २५ वर्षे पंचायत सदस्य असलेले याच पॅनलचे मा. सरपंच दत्तात्रय (आण्णा) ढोले यांचा तीर्थक्षेत्र मोरगावला ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात आणण्यात सिंहाचा वाटा होता. त्यामुळे आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून, काम करणार्या रोहिणी संदिप ढोले (कदम) या मोरगाव तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गात नक्कीच घेऊन येतील असा ग्रामस्थांना विश्वास आहे. त्यामुळे मोरगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत रोहिणी संदिप ढोले (कदम) विजयी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.