हवेली प्रतिनिधी :
दि. 17 डिसेंबर 2022
आव्हाळवाडी येथील निवडणुकीबाबतचा मतदारांचा कल स्पष्टपणे दिसून येतो आहे. यात वॉर्ड क्र. 2 मधील लढतीबाबत कमालीची उत्सुकता असल्याने या वॉर्डमध्ये फेरफटका मारला असता तेथे काकासाहेब रामराव सातव यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र समोर आले. त्यांच्याबरोबरच त्यांच्या सहकारी सारिका मारुती सातव आणि सविता तनाजी सातव याही विजयी होतील असे ग्रामस्थांनी संगितले.
ग्रामस्थांनी काकासाहेब सातव आणि त्यांच्याबरोबरील इतर दोन महिला उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार केल्याचे त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून जाणवले. काकासाहेब सातव यांनी आत्तापर्यंत वॉर्डसाठी केलेली विविध कामेच त्यांना विजय मिळवून देतील असे बहुसंख्य ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ज्या व्यक्तीने गावातील रस्ते चांगले केले, ड्रेनेज लाईन टाकून गावात स्वच्छता आणण्याचा प्रयत्न केला, जिल्हा परिषदेची नवी इमारत सर्वांच्या सहकार्याने बांधली आणि इतरही लोकोपयोगी बरीच कामे केली, त्या व्यक्तीला आम्ही का निवडून देणार नाही? असा उलट प्रश्न ग्रामस्थ इथे विचारतात. त्यांना काकासाहेब रामराव सातव यांच्याबद्दल अतिशय कृतज्ञतेची भावना असल्याचे या चर्चेदरम्यान जाणवले.
गावाच्या विकासासाठी काकासाहेबांनी केलेली कामे म्हणजे त्यांचं खणखणीत नाणं आहे असे ग्रामस्थच बोलतात. या गोष्टींमुळे विरोधी गटातील वातावरण तणावग्रस्त असल्याचे बोलले जात आहे. “काकासाहेबांनी गावासाठी ज्या मनोभावे काम केले आहे ते आमच्या समोर आहे” असे एक वृद्ध आजोबा आमच्याशी बोलताना म्हणाले. शासनाच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम हे उमेदवार चोखपणे पार पाडतील असा विश्वास सार्या ग्रामस्थांना आहे. काकासाहेब रामराव सातव यांच्या कार्यकुशलतेवर आणि प्रामाणिकपणावर ग्रामस्थांचा नितांत विश्वास आहे असे या भेटीदारम्यान जाणवले. वॉर्ड क्र. 2 मधून काकासाहेबांसह सारिका मारुती सातव आणि सविता तनाजी सातव यांचा विजय ग्रामस्थांनी नक्की मानल्याचेच चित्र या भेटीत पूर्णवेळ दिसून आले.