राजस्थान प्रतिनिधी :
दि. 27 डिसेंबर 2022
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार ईडी ची कारवाई रोखण्याबद्दलची, प्रियांका वाड्रा – गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे त्यांना ईडी कडून चौकशीसाठी अटक केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढेच नव्हे तर वाड्रा यांच्या मातोश्रींनाही अटक होऊ शकते.
या प्रकरणाची थोडक्यात अकीकत अशी. 2010 साली कॉंग्रेसचे सरकार असताना बीकानेर जवळील कोलायत येथे रॉबर्टं वाड्रा यांनी केवळ 72 लाख रुपयांमध्ये 275 बिघा म्हणजे साधारण 170 एकर जमीन खरेदी केली. मिळालेल्या माहितीनुसार ही जमीन त्यांनी आपल्या ड्रायव्हरच्या नावे खरेदी केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सर्व सरकारी जमीन असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यावेळी गहलोत हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांची मदत या कामी झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नंतर ड्रायव्हरकडून दोन महिन्यांनी ही जमीन घेऊन तब्बल 615% फायद्याने त्यांनी विकल्याचे समजते. ड्रायव्हरच्या नावाने ही जमीन विकत घेण्याच्या प्रकारानंतरच ईडी ने या प्रकरणात एंट्री केल्याचेही सूत्रांकडून समजते.
मात्र हायकोर्टाने याचिका फेटाळताना वाड्रा यांना सुप्रीम कोर्टात जाऊन सफाई देण्यासाठी वा बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.