DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘प्रगती पॅनल’चा बोलबाला.

आतापर्यंत केलेली कामे देणार घवघवीत यश?

DD News Marathi by DD News Marathi
January 10, 2023
in Uncategorized
0
पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘प्रगती पॅनल’चा बोलबाला.

पुणे प्रतिनिधी :

दि. 10 जानेवारी 2023

पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2022 ते 2027 येत्या शनिवार दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी संपन्न होत आहे. पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन DNE 136 व सहकारी संघटना पुरस्कृत या निवडणुकीत ‘प्रगती पॅनलचे’ 13 उमेदवार सर्वसाधारण गटातून आणि 5 उमेदवार राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवित आहेत.

या निवडणुकीच्या निमित्ताने सदर प्रतिनिधीने विविध लोकांशी, सभासदांशी संवाद साधला. त्यांच्या मते ‘प्रगती पॅनल’ने जो वचननामा प्रसिद्ध केला आहे तो पतसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भरभराटीसाठी पूरक असून तो त्यांची विकासाबाबतची दूरदृष्टी दर्शवितो. ठरवलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण करणारे आणि प्रत्येक संकल्प सिद्धीस नेणारे अशी ‘प्रगती पॅनल’ची ख्याती आहे असे बहुतेकांचे म्हणणे दिसले. 2022 ते 2027 या पंचवार्षिक कार्यकाळात ‘प्रगती पॅनल’ पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेला वेगाने प्रगतिपथावर घेऊन जाईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील कार्यकाळातील त्यांचे काम याचे साक्षीदार असल्याची भावना बर्‍याच जणांनी बोलून दाखविली. त्यांच्या वचननाम्याबद्दल विचारले असता काही जुन्यासभासदांनी यातील ठळक मुद्दे सांगितले.

कर्जमर्यादा पुढील २ वर्षांत १० लक्ष वरुन १५ लक्ष रु. केली जाईल. सर्व सभासदांचे सन्मानपूर्वक व हितावह आर्थिक हित जोपासले जाईल. सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘कन्यादान योजना’ राबवून मुलीच्या विवाहासाठी या योजनेअंतर्गत आकस्मिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल. पतसंस्थेचा कारभार पारदर्शक व संगणकीकृत करण्यासाठी तातडीने पतसंस्थेची ऑनलाईन प्रणाली व मोबाईल अॅप सुविधा विकसित करणे या बाबीही शक्य तेवढ्या लवकर पूर्ण केल्या जातील. पतसंस्थेसाठी जागेची मध्यवर्ती ठिकाणी खरेदी करुन त्यावर इमारत बांधली जाईल. ‘झटपट अर्ज व पटकन कर्ज’ संकल्पना नियमित ठेवून सभासदांच्या अडचणी सोडविल्या जातील. तातडीची कर्जमर्यादा ५० हजारांवरुन २ लक्ष रुपये केली जाईल. पूर्वीच्या कर्जावर या कर्ज मर्यादेपर्यंत टॉपअप कर्ज सुविधा दिली जाईल. अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी होवून कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या व दुर्धर आजाराने ग्रस्त झालेल्या सभासदास तात्काळ स्वरुपात विना परतावा सानुग्रह अनुदान देण्यात येईल. मयत झालेल्या सभासदांच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या ‘सभासद कल्याण निधी’ (डेथ फंड) मध्ये ५ लक्ष पर्यंत वाढ करण्यात येईल. अत्यंत महत्वाचे म्हणजे २०२२ ते २०२७ या आर्थिक वर्षात विद्यमान संचालक थकबाकीदार राहणार नाही यासाठी शपथपूर्वक अभिवचन प्रगती पॅनलने दिले आहे. सभासदाच्या आकस्मिक मृत्यूनंतर जामीनदारावर येणारी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी कर्जाला विमा संरक्षण ते देणार आहेत व सर्व सभासदांच्या कुटुंबियांस सांघीक विमा संरक्षण व कॅशलेस आरोग्य विमा पुरविणार आहेत. याशिवाय सभासदांच्या पाल्यांना ‘उच्च शिक्षणासाठी रु. ५ लक्ष एवढे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देणार, ससंस्थेच्या मालमत्तांचे योग्य नियोजन करुन मालमत्ता अबाधित ठेवून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार असे वचननाम्यातील मुद्दे सभासद अतिशय विश्वासाने व आपलेपणाने सांगताना दिसले. ‘प्रगती पॅनल’ही सर्व वचने पूर्ण करण्यास सक्षम असून ते ही वचने पूर्ण करतील असाच सूर या लोकांचा दिसला.

असा सर्वसमावेशक, पतसंस्थेच्या प्रगतीला पोषक आणि सभासदांना हितावाह असा कारभार करण्याचे वचन देणारे प्रगती पॅनल प्रचंड बहुमताने विजयीहोईल आणि भरभराटीची द्वारे खुली करील असा विश्वास सर्वांना आहे. गतिमान प्रगतीसाठी फक्त ‘कपबशी’ या चिन्हावर शिक्का मारुन ‘प्रगती पॅनलच्या’ सर्व 18 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार या सभासदांनी केल्याचेच चित्र सदर भेटीवेळी पाहायला मिळाले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #amolgholve#pragatipanel#punejilhagramasevaksahakaripatasanstha
Previous Post

पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियन DNE 136 व सहकारी संघटना पुरस्कृत, ‘प्रगती पॅनल’च्या प्रचाराचा भव्य शुभारंभ

Next Post

कोण असणार गॅंगस्टर अतिकच्या संपत्तीचा वारस?

Next Post
कोण असणार गॅंगस्टर अतिकच्या संपत्तीचा वारस?

कोण असणार गॅंगस्टर अतिकच्या संपत्तीचा वारस?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

June 16, 2025
‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.