DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कोण असणार गॅंगस्टर अतिकच्या संपत्तीचा वारस?

अतिकची पत्नी शाइस्ता परवीन फरारी

DD News Marathi by DD News Marathi
April 18, 2023
in ताज्या बातम्या
0
कोण असणार गॅंगस्टर अतिकच्या संपत्तीचा वारस?

लखनऊ बातमीदार:

दि. 18 एप्रिल 2023

उत्तर प्रदेशमधील गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना प्रयागराजमधील कसारी-मासारी स्मशानभूमीत कडक सुरक्षा व्यवस्थेत दफन करण्यात आले. अतिकचा मुलगा असदसह कुटुंबातील इतर सदस्यांना ज्या ठिकाणी दफन करण्यात आले, त्याच ठिकाणी या दोन्ही भावांना दफन करण्यात आले आहे. दरम्यान, गॅंगस्टर अतिक अहमद हा १२०० कोटींच्या मालमत्तेचा मालक होता, असे सूत्रांकडून समजते आहे.अतिकच्या या संपत्तीचा वारसदार कोण आणि ती कोणाला मिळणार, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

प्रयागराज येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना अतिक आणि अशरफ अहमद या दोन्ही भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात आतिकला आठ गोळ्या लागल्याचे, तर अश्रफला सहा गोळ्या लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रयागराज आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अतिकची तब्बल 40 वर्षे चलती होती. या काळात त्याने अमाप संपत्ती कमावली. माध्यमांतील अहवालानुसार, अतिक हा १२०० कोटींच्या मालमत्तेचा मालक होता. मात्र, हा आकडा यापेक्षा खूप मोठा असण्याचा अंदाज आहे. यात अनेक बेनामी आणि बेकायदेशीर मालमत्तांचा समावेश आहे.

असद आणि गुलामचे एन्काउंटर होण्यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने अतिक आणि त्याच्या अनेक जवळच्या मित्रांच्या घरांवर छापे टाकले होते. या छाप्यात तपास यंत्रणेने १५ ठिकाणांवरून बेनामी आणि बेकायदेशीर संपत्तीची १०० हून अधिक कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय प्रयागराज आणि लखनऊच्या पॉश भागातही अतिकची मालमत्ता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ती एकतर अतिक किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असू शकते.

अतिकची पत्नी शाइस्ता परवीन सध्या फरारी आहे. ती अतिकच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित नव्हती. त्याचा मुलगा असद हा चकमकीत मारला गेला आहे. दोन मुले बालसुधारगृहात आहेत. अवैध आणि बेनामी मालमत्तेची काळी गुपिते अतिक आणि अश्रफ यांच्याबरोबरच दफन झाली आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्र आणि प्राप्तीकराच्या कागदपत्रांमध्ये अतिकने आपले उत्पन्न खूपच कमी दाखविल्याचे समजते.

दादागिरीच्या जोरावर अतिकने अत्यंत कमी दरात मालमत्ता खरेदी केल्या होत्या. दस्तांमध्ये जी रक्कम दाखवण्यात आली आहे, ती भरलेली नाही. अतिकने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून (शेल कंपन्या) काळा पैसा पांढरा केला आहे (Money Laundering). यामध्ये प्रयागराजचे व्यापारी दीपक भार्गव आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजीव अग्रवाल यांनी त्याला मदत केल्याचे समजते.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अतिकच्या कुटुंबीयांची अद्याप चौकशी केलेली नसली तरी त्यांनी गरीब आणि असहाय लोकांच्या जमिनी त्यांना धाक दाखवून हडप केल्याचे ईडीच्या तपासात उघड झालेले आहे. जी जमीन विकत घेतली, ती गुन्हेगारीच्या कमाईतून घेतल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात अतिकची पत्नी आणि इतर दोन मुलांची ईडीकडून चौकशी होऊ शकते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ashraf#atiqahemad #encounter#UP#yogiadityanath
Previous Post

पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘प्रगती पॅनल’चा बोलबाला.

Next Post

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत इतिहास घडणार

Next Post
पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत इतिहास घडणार

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत इतिहास घडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.