पुणे प्रतिनिधीः
न-हे-धायरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी भुपेंद्र मोरे यांनी वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करुन वाढदिवस साजरा केला. त्यामूळे सध्या कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत असताना त्यांनी राबविलेला सामाजिक उपक्रम आदर्शवत ठरला आहे.
भुपेंद्र मोरे हे धायरी व न-हे परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यररत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पदाधिकारी हे आहेत. त्या माध्यमातून ते महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक आदींकरिता सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांचा वाढदिवस दरवर्षी कार्यकर्ते धुमधडाक्यात साजरा करित असतात. मात्र, या वर्षीचा वाढदिवस थोडा वेगळा ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामूळे रक्तदान शिबिराचे आयोजन करुन त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करुन सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर व माजी नगरसेवक काका चव्हाण यांच्या हस्ते या शिबिराचे उद्धघाटन करण्यात आले.