DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

काँग्रेस महिला अध्यक्षाचा दोन नेत्यांकडून छळ झाल्याचा धक्कादायक खुलासा

राहुल गांधींनी दखल न घेतल्यामुळे महिला आयोगाकडे धाव

DD News Marathi by DD News Marathi
April 19, 2023
in राजकीय
0
काँग्रेस महिला अध्यक्षाचा दोन नेत्यांकडून छळ झाल्याचा धक्कादायक खुलासा

डी. डी. न्यूज प्रतिनिधी :

दि. १९ एप्रिल २०२३

आसाम यूथ काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. अंगकिता दत्ता यांनी युथ कॉंग्रेसच्या दोन नेत्यांविरुद्ध महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी आणि प्रभारी सचिव वर्धन यादव यांच्याविरोधात हा छळवणुकीचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्रीय पक्ष नेतृत्वाने त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे डॉ. दत्ता यांनी महिला आयोगाकडे धाव घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

“मी एक महिला नेता आहे, महिला असल्यामुळे श्रीनिवास बीवी आणि वर्धन यादव हे मला तुच्छतेची वागणुक देत आहेत. याबाबत मी राहुल गांधी यांच्याकडेही तक्रार केली होती, पण त्यानंतरही काही कारवाई झाली नाही. माझ्याशी संवाद साधताना हे दोन्ही नेते ‘ए लडकी’असा उल्लेख करीत असतात. रायपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात या दोन्ही नेत्यांनी माझ्याशी बोलताना अपमानकारक शब्दांचा वापर केला आहे. त्यामुळे मी त्रस्त झाले आहे. “तु काय पीते, कुठली दारु पीते,” अशा प्रकारचे प्रश्न ते विचारतात. भारत जोडो यात्रेत जेव्हा मी सहभागी झाले होते, तेव्हा त्यांच्याविरोधात मी खुद्द राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली होती. पण त्यानंतरही कुठलीही कारवाई झाली नाही. सहा महिन्यांपासून मला ते अशा प्रकारचा त्रास देत आहेत” अशी तक्रार डॉ. अंगकिता दत्ता यांनी महिला आयोगाकडे केली आहे.

“माझे वडील, आजोबा हे राज्य काँग्रेसचे अध्यक्ष होते. अशी पार्श्वभूमी असताना पक्ष सोडण्याची आमची इच्छा नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही आम्हाला पक्षाच्या बाहेर काढू शकता, पण आमचे पक्षावर प्रेम आहे”, असेही डॉ. दत्ता म्हणाल्या.

डॉ. दत्ता पुढे म्हणतात, “आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबतचे काही पोस्टर त्यांच्याकडून तयार केले जात आहेत. त्यांच्यासोबत संगनमत करीत असल्याचा आरोप वर्धन यादव यांनी माझ्यावर केला आहे.” डॉ. अंगकिता दत्ता आसामचे माजी मंत्री अंजन दत्ता यांच्या कन्या आहेत. ते काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. डॉ. अंगकिता यांनी काँग्रेसकडून अममुरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Dr.AngkitaDatta#HimantaBiswasarma#nationalcommissionforwomen#VardhanYadav#youthcongress
Previous Post

नागपूर पूर्वमध्ये भाजपला पराभूत करणे आघाडीला अवघड नाही?

Next Post

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल विजयी होणार?

Next Post
पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल विजयी होणार?

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल विजयी होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.