पुणे प्रतिनिधी :
दि. २२ एप्रिल २०२३
तब्बल १९ वर्षांनंतर होत असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे असे परिसरात फेरफटका मारला असता लक्षात आले. यानिमित्ताने लोकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की या १९ वर्षांच्या काळात निर्माण झालेल्या ज्या काही त्रुटी, समस्या व्यापारी व आडते यांना भेडसावत आहेत त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी अनुभवी आणि अभ्यासू असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणूनच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिलेले आणि आडते असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम प्रकारे काम केलेले श्री. विलास दत्तात्रय भुजबळ, व्यापार विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. पुढे हे लोक असंही म्हणाले की त्यांच्यासमवेत श्री. अमोल मुरलीधर घुले हेही आडते व्यापारी यांचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवित आहेत. म्हणूनच छोटे व्यापारी व आडते यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व्यापार विकास पॅनलला निवडून देणं अतिशय आवश्यक आहे.
घुले यांच्याबद्दल उपस्थितांना या प्रतिनिधीने अधिक माहिती विचारली असता ते म्हणाले, मुरलीधर पंढरीनाथ घुले अर्थात एम. पी. घुले म्हणून सुपरिचित असलेल्या आपल्या वडिलांना प्रेरणास्थान मानणारं आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून मार्गक्रमण करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. अमोल मुरलीधर घुले! आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष ह्या नात्याने काम केलेले, तत्कालीन अध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.विलासशेठ भुजबळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले श्री. घुले यांना आडते व्यापारी, विक्रेते, शेतकरी व खरेदीदार व्यापारी ह्यांच्या विविध समस्या सोडविण्याचा चांगलाच अनुभव आहे.
कोणताही स्वार्थ मनात न ठेवता फक्त आपल्या व्यापारी बांधवांसाठी निवडणूक लढवित असलेले अनुभवी, प्रामाणिक आणि व्यापर्यांच्या प्रगतीची तळमळ असलेले हे दोन्ही उमेदवार आहेत असे सर्वांनी एकसुरात संगितले. पैसे देणे, बाजार आवारामध्ये जागा देण्याचे आश्वासन देणे, आणखी बरेच काही उपदव्याप या निवडणुकीआधी केले जात असल्याचेही यावेळी समजले. पण लोक म्हणतात की जर आम्ही या क्षणिक आणि दिशाभूल करणार्या मोहाला भुललो तर त्यातून चुकीचे प्रतिनिधी निवडून येऊ शकतात. मार्केटमध्ये चांगले लोकप्रतिनिधी निवडले तर चांगला कारभार होऊ शकेल हे आम्ही जाणून आहोत.
त्यामुळे मतदारांशी साधलेल्या एकूण संवादातून आणि त्यातून मिळालेल्या माहितीतून व्यापार विकास पॅनललाच त्यांची प्रथम पसंती आहे असे दिसते.