पुणे शहर प्रतिनिधी
दि. २२ एप्रिल २०२३
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा दबदबा स्पष्टपणे जाणवतो आहे. येत्या 28 एप्रिल रोजी संपन्न होत असलेल्या निवडणुकीसाठी सेवा सहकारी मतदारसंघ व ग्रामपंचायत मतदारसंघ यांचे एकूण १५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात सेवा सहकारी मतदारसंघाचे ११ तर ग्रामपंचायत मतदारसंघाचे ४ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत.
अण्णासाहेब मगर सहकार पॅनलने प्रत्येक विभागातून एक उमेदवार देऊन समतोल साधला आहे आणि ही त्यांची जमेची बाजू आहे असा सूर परिसराला भेट दिली असता सर्वत्र ऐकू आला. यामुळे या निवडणूक क्षेत्रातील प्रत्येक विभागामधून सहकार पॅनलचा उमेदवारच निवडून येईल अशी जोरदार चर्चा सर्व विभागांत आहे. शिवाय त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्षांनी पुरस्कृत केलेले असल्याने साहजिकच त्यांची बाजू वरचढ मनाली जात आहे. त्यांनी नियोजित केलेले येत्या पाच वर्षांतील उपक्रम लोकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते आहे.
मतदारांबरोबरच काही उमेदवारांशीही आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनीही त्यांच्या योजनांबद्दल माहिती दिली. या उमेदवारांच्या मते त्यांच्या जाहीरनाम्यात, क्रांतिकारक ठरतील अश्या कित्येक योजनांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने भाज्या व फुलांसाठी कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था करणे, शेतकर्यांसाठी सकस अन्न अगदी अल्प दरात उपलब्ध करणे, स्वतंत्र फिश व मटण मार्केट सुरू करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन शेतकर्यांना सक्षम करून त्यांचा व्यवहार सुगम करणे या योजनांचा समावेश आहे. शिवाय पुणे शहराची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेऊन नवी मुंबई, वाशी मार्केटच्या धर्तीवर नवीन पुणे मार्केट उभारण्याचेही अण्णासाहेब मगर सहकार पॅनलने जाहीर केल्याचे यावेळी समजले.
अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन, कष्टाची कामे रोबोकडून करून घेणे, शेतकर्यांच्या वाहनांना जीपीएस सिस्टिम बसविणे, 24 x 7 कॉल सेंटर सुरू करणे, मोबाईल अॅप बनविणे जेणेकरून शेतकर्यांना ताज्या बाजारभावाची माहिती मिळेल अश्या दूरदृष्टीने योजलेल्या अनेक सुधारणा अण्णासाहेब मगर सहकार पॅनल करणार आहे असेही या उमेदवारांशी बोलताना समजले.
शेतकर्यांच्या भल्याचा सर्वांगीण विचार करून त्यांच्या उन्नतीचा आणि सुलभ व्यवहाराचा ध्यास घेतलेल्या, राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर पॅनलचाच विजय या १९ वर्षांनंतर होणार्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निश्चित आहे असे सारे एकसुरात सांगत आहेत.