DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आडते व्यापारी मतदार संघात अमोल घुले व विलास भुजबळ यांचा विजय निश्चित!

 "व्यापार विकास पॅनेल, समृद्धी आणेल" अशी मतदारांची भावना

DD News Marathi by DD News Marathi
April 24, 2023
in ताज्या बातम्या
0
आडते व्यापारी मतदार संघात अमोल घुले व विलास भुजबळ यांचा विजय निश्चित!

पुणे प्रतिनिधी :

दि. २४ एप्रिल २०२३

येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका तब्बल १९ वर्षांनंतर होत आहेत. या १९ वर्षांत प्रशासकीय कारभार होता. त्यामुळे आता त्यात बदल होणार असल्याने या निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता अनुभवायला मिळते आहे. साहजिकच आम्ही विविध मतदारांशी संपर्क साधून त्यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विलास दत्तात्रय भुजबळ व अमोल मुरलीधर घुले हे व्यापार विकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. या दोघांबद्दलही अतिशय सकारात्मक मते या भेटीदरम्यान ऐकायला मिळाली. ते म्हणाले या १९ वर्षांच्या काळात निर्माण झालेल्या ज्या त्रुटी, समस्या व्यापारी व आडते यांना भेडसावत आहेत त्यांना समूळ नष्ट करण्यासाठी हे दोघेही सक्षम आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे असा बदल घडवून आणण्याची त्यांची वृत्ती आहे.

या मतदारांनी पुढे संगितले की विलास दत्तात्रय भुजबळ हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहिलेले आहेत आणि त्यांनी आडते असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही अतिशय उत्तम प्रकारे काम केलेले आहे. हा त्यांचा अनुभव आणि त्यांच्या कामाबद्दल आम्हाला असलेली कल्पना यामुळे दुसर्‍या कुणाला मत देण्याचा विषयच उरत नाही.

श्री. अमोल मुरलीधर घुले हे मुरलीधर पंढरीनाथ घुले अर्थात एम. पी. घुले म्हणून सुपरिचित असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे चिरंजीव आहेत. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकूनच ते मार्गक्रमण करीत आहेत याचीही मतदारांना विशेष जाणीव आहे. आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले, तत्कालीन अध्यक्ष व ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.विलासशेठ भुजबळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले अमोल मुरलीधर घुले यांना, आडते व्यापारी, विक्रेते, शेतकरी व खरेदीदार व्यापारी ह्यांच्या विविध समस्या सोडविण्याचा चांगलाच अनुभव आहे.

या दोन्ही उमेदवारांची लोकांमध्ये असलेली प्रतिमा आणि त्यांची एकंदरीत पार्श्वभूमी लक्षात घेता छोटे व्यापारी व आडते यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व्यापार विकास पॅनललाच निवडून देणं अतिशय आवश्यक आहे असे बहुतांशी लोकांचे म्हणणे आहे.

लोककल्याणाची क्षमता आणि अधिकार एकदा निवडून आल्यावर येतातच, पण तसं करण्याची वृत्ती मुळात अंगी असणं हे मात्र अतिशय आवश्यक असतं. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णयोग व्यापार विकास पॅनलच्या विलास दत्तात्रय भुजबळ आणि अमोल मुरलीधर घुले यांच्या रूपाने जुळून येईल अशीच मतदारांची भावना आहे आणि हीच भावना व्यापार विकास पॅनलला सहजगत्या विजय मिळवून देईल असे वाटते.

 

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #APMCPUNE#marketyardpune#VyaparVikasPanel
Previous Post

‘अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी’ भाजप प्रणित छुपा पॅनल!

Next Post

हमाल मापाडी मतदार संघाच्या राजेंद्र चोरघे यांचा विजय निश्चित

Next Post
हमाल मापाडी मतदार संघाच्या राजेंद्र चोरघे यांचा विजय निश्चित

हमाल मापाडी मतदार संघाच्या राजेंद्र चोरघे यांचा विजय निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.