DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा विजय निश्चित

मतदारांचा वाढता पाठिंबा

DD News Marathi by DD News Marathi
April 25, 2023
in Uncategorized
0
पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा विजय निश्चित

पुणे शहरः प्रतिनिधी,
दि. २५ एप्रिल २०२३

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा विजय, लोकांशी झालेल्या संवादाच्या आधारे स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुका येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी संपन्न होत आहेत. निवडणुकीसाठी सेवा सहकारी मतदारसंघ व ग्रामपंचायत मतदारसंघ यांचे एकूण १५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. यात सेवा सहकारी मतदारसंघाचे ११ तर ग्रामपंचायत मतदारसंघाचे ४ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत.

अण्णासाहेब मगर सहकार पॅनलची जमेची बाजू म्हणजे त्यांनी प्रत्येक विभागातून एक उमेदवार देऊन समतोल साधला आहे असे बहुतांशी लोकांनी संगितले. त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्षांनी पुरस्कृत केलेले अण्णासाहेब मगर सहकार पॅनल लोकांच्या पसंतीचे असल्याचे विविध लोकांशी बोलताना जाणवत होते. त्यांनी नियोजित केलेले येत्या पाच वर्षांतील उपक्रम कोणते याची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही काही उमेदवारांशी बोलून केला.

त्यांच्या जाहीरनाम्यात, क्रांतिकारक ठरतील अश्या कित्येक योजनांचा समावेश आहे असे या उमेदवारांनी उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे संगितले. यात प्रामुख्याने, पुणे शहराची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेऊन नवी मुंबई, वाशी मार्केटच्या धर्तीवर नवीन पुणे मार्केट उभारणे हे प्रमुख लक्ष्य असल्याचे समजले. याशिवाय भाज्या व फुलांसाठी कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था करणे, शेतकर्‍यांसाठी सकस अन्न अगदी अल्प दरात उपलब्ध करणे, स्वतंत्र फिश व मटण मार्केट सुरू करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन शेतकर्‍यांना सक्षम करणे याबरोबरच तरकारी वाहनांमध्ये जीपीएस सिस्टिम बसविण्याचाही अंतर्भाव आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन, मोबाईल अॅप बनविणे जेणेकरून शेतकर्‍यांना ताज्या बाजारभावाची माहिती मिळेल, कष्टाची कामे रोबोकडून करून घेणे, 24 x 7 कॉल सेंटर सुरू करणे, अश्या दूरदृष्टीने योजलेल्या अनेक सुधारणा अण्णासाहेब मगर सहकार पॅनल करणार आहे असेही या उमेदवारांनी संगितले.

उमेदवारांकडून समजलेल्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या योजना आणि मतदारांचा मिळत असलेला प्रतिसाद, त्यांची या पॅनलबद्दल असलेली मते यांवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस मित्र पक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर पॅनलचाच विजय या १९ वर्षांनंतर होणार्‍या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निश्चित आहे असे दिसते आहे.

 

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AnnasahebMagarSahakarPanel#APMCPUNE#NCP
Previous Post

हमाल मापाडी मतदार संघाच्या राजेंद्र चोरघे यांचा विजय निश्चित

Next Post

बालेकिल्ल्यातील नेतेमंडळींमुळे अण्णासाहेब मगर सहकार पॅनल ठरतेय सरस!

Next Post
बालेकिल्ल्यातील नेतेमंडळींमुळे अण्णासाहेब मगर सहकार पॅनल ठरतेय सरस!

बालेकिल्ल्यातील नेतेमंडळींमुळे अण्णासाहेब मगर सहकार पॅनल ठरतेय सरस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

June 16, 2025
‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.