पुणे प्रतिनिधी :
दि. 27 एप्रिल 2023
उद्या 28 एप्रिलला होऊ घातलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आडते व्यापारी गटातून व्यापार विकास पॅनल बाजी मारून जाणार असे चित्र सर्वत्र दिसते आहे. या पॅनलमधून अमोल मुरलीधर घुले व विलास दत्तात्रय भूजबळ या दोन्ही उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळतो आहे.
कोणताही स्वार्थ मनात न ठेवता फक्त आपल्या व्यापारी बांधवांसाठी ही निवडणुक ते लढवित असल्याची पूर्ण खात्री मतदारांची झाली आहे. शिवाय या निवडणुकीत जे लोक मतदारांना प्रलोभनं दाखवीत आहेत ते पूर्णपणे लोकांच्या मनातून उतरले आहेत. कारण ज्यांच्यात काही कुवत नाही किंवा ज्यांना फक्त सत्ता काबिज करून नंतर फक्त आपलेच खिसे भरायचे आहेत, तेच असले धंदे करतात हे लोकांना कळून चुकले आहे. लोकांनी स्पष्टपणे असे सांगितले आहे की हे पैसे द्यायची भाषा करतात, बाजार आवरामध्ये जागा देऊ असे सांगतात. पण असे करायची वेळच यांच्यावर का आली असा उलट सवाल लोकांच्या मनात उभा ठाकला आहे. अश्या फुकटच्या थापांना बळी पडून स्वतःबरोबर सार्या आडते व्यापर्यांचा जीव पुढल्या पाच वर्षांसाठी टांगणीला लावण्याइतके आम्ही स्वार्थी नाही असे लोक निक्षून सांगत आहेत. चुकीचे प्रतिनिधी निवडून येऊ नयेत यासाठी आपण सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे असं सांगून हे मतदार एकमेकांना जागृत करत आहेत. मार्केटमध्ये चांगले लोकप्रतिनिधी निवडले तर चांगला कारभार होऊ शकेल हे ते चांगलेच जाणून आहेत. क्षणिक आणि खोट्या फायद्यासाठी आम्ही अविचाराने मतदान करणार नाही आणि फक्त व्यापार विकास पॅनललाच निवडून देऊ असे सारे एकसुरात सांगत आहेत. त्यामुळे आत्तापासूनच व्यापार विकास पॅनलमध्ये विजयाचे वारे वाहू लागले आहेत.