पुणे प्रतिनिधी :
दि. 27 एप्रिल 2023
शुक्रवार दि. २८ एप्रिलला होणार्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती. हमाल मापाडी मतदारसंघातून राजेंद्र ज्ञानोबा चोरघे हे निवडणूक लढवित असून त्यांना कष्टकर्यांचे आराध्य दैवत असणार्या आणि सर्वांना नितांत आदरस्थानी असणार्या खुद्द बाबा आढाव यांचा आशीर्वाद लाभलेला असल्याने त्यांचे पारडे साहजिकच भरपूर जड आहे असे दिसते. बाबा स्वतः त्यांच्या कचेरीचे उद्घाटन, त्यांचा लोकसंपर्क यांमध्ये त्यांच्याबरोबर असल्याने हमाल मापाडी बांधवांचा न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद त्यांना मिळतो आहे. शिवाय राजेंद्र चोरघे यांनी या कष्टकर्यांसाठी आतापर्यंत जीव ओतून केलेले काम सर्वांच्या स्मरणात आहे.
डॉ. बाबा आढाव यांचे विशेष प्रयत्न आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून, राजेंद्र चोरघे यांनी कष्टकरी कामगार, तोलणार वर्गातील एक प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवडून जाईल हा महत्त्वपूर्ण निर्णय संमत करून घेतला. राजेंद्र चोरघे हे बाबांच्या आचार विचारांत वाढलेले आहेत हे या सार्या कष्टकरी वर्गाला माहिती आहे. याचा अगदी हुकमी फायदा चोरघे यांना होणार आहे. माथाडी मंडळाच्या हिशोबाची मागणी, कोट्यावधी रुपयांच्या शिल्लक तोलाईचे वाटप, तोलणार कामगारांसाठी अनुकंपा, माथाडी कामगारांना रु. ५० हजारांची तातडीची वैद्यकीय मदत इत्यादी अनेक कल्याणकारी कामे चोरघे यांनी कष्टकरी वर्गासाठी केलेली असल्याने ही पुण्याई त्यांच्या नक्कीच कामी येईल असे स्पष्ट दिसत आहे.
याउलट बाबा आढावांची विनंती धुडकावून, त्यांची अवज्ञा करून स्वतःच निर्णय घेऊन या निवडणुकीत उतरलेल्या संतोष नांगरे यांना अवघड परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. बाबा आढाव यांच्यासारख्या, सर्व वर्गाच्या दृष्टीने अत्यंत आदरणीय व्यक्तीचा, जे ९३ व्या वर्षीही सर्व कष्टकर्यांसाठी उभे आहेत, अनादर त्यांनी केल्यामुळे सर्वांपासून ते वेगळे व एकटे पडल्याचे चित्र दिसते आहे. या वर्गातील सर्वच जण त्यांच्यावर नाराज आहेत.
या सार्या गोष्टींचा एकच अर्थ निघताना दिसतो आहे आणि तो म्हणजे राजेंद्र चोरघे यांचा सुनिश्चित आणि दणदणीत विजय.