DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

रांजणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मानसिंग पाचुदंकर मुख्य भूमिकेत

ठरणार किंगमेंकर

DD News Marathi by DD News Marathi
October 22, 2023
in महाराष्ट्र, राजकीय
0
रांजणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मानसिंग पाचुदंकर मुख्य भूमिकेत

शिरुर प्रतिनिधी/ डीडी न्युज मराठी

दि.22 ऑक्टोबर 2023 

देशातील महत्वाची एमआयडीसी म्हणून ओळख असलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीची निवडणुक येत्या ५ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. दोन पेक्षा जास्त पॅनल निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात. मात्र, या सगळ्यात निवडणुकीच्या पिक्चरमध्ये मानसिंग पाचुंदकर हे मुख्य भूमिकेत असलेले दिसून येत आहे. त्यांच्या पॅनलसोबत जो पॅनल किंवा जे उमेदवार येतील तेच या अंगावर गुलाल घेतील अशी परिस्थिती आहे.

रांजणगाव गणपतीची निवडणुक ही नेहमीच प्रतिष्ठेची निवडणुक असते. सरपंच पदासाठी यंदाही थेट जनतेतून निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मागावसवर्गीय महिला आरक्षण पडल्यामुळे अनेकांचा सरपंच होण्याचा हिरमोड झाला आहे. तरिही या निवडणुकीतील रंगत कमी झाली नसल्याचे दिसत आहे. प्रत्येकाला त्यांच्या राजकीय भविष्यासाठी या ग्रामपंचायतीत कशी का असेना सत्ता हवी आहे. म्हणूनच संपुर्ण जिल्ह्याचे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. आजपर्यंत पाचुंदकर आणि खेडकर या दोन पॅनल मध्ये प्रामुख्याने लढत झालेल्या आहेत. मात्र, आज रांजणगावमध्ये जवळपास ४ पॅनल होण्याची शक्यता आहे. यामध्ये मानसिंग पाचदुंकर, सर्जेराव खेडकर, श्रीकांत पाचुंदकर, राहुल पवार व शेखर पाचुंदकर आणि स्वाती पाचुंदकर असे पॅनल दिसून येत आहेत. शेवटच्या क्षणी त्यापैकी कोणतेही दोन पॅनल रिंगणात राहु शकतात. त्यासाठी एक एक पॅनल कोणत्या ना कोणत्या पॅनलमध्ये जाँईन होण्याची शक्यता आहे. अगदी कट्टर विरोधक ही पक्के दोस्त होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे.

मात्र, या निवडणुकीच्या रणसंग्रामात मानसिंग पाचुंदकर हे मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनीही स्वतंत्र्य पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी केली आहे. चार पॅनलपैकी मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनलकडे उमेदवारीसाठी सर्वात जास्त इच्छुकांचा ओढा आहे. आगामी काळात होणा-या जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेऊन मानसिंग पाचुंदकर हे कोणतीही रिस्क न घेता मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहेत. प्रत्येक वॅार्डातील मातब्बर असे आघाडीचे शिलेदार त्यांनी सोबतीला घेतले आहेत. तसेच त्यांनी सरपंच म्हणून दहा वर्षापुर्वी केलेलं उल्लेखनीय काम गावकरी आजही विसरले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मानसिंग पाचुंदकर हेच या निवडणुकीचे किंगमेकर असतील यात तिळमात्र शंका नाही.

बातमी नक्की शेअर करा
Tags: राजकारणशिरूर
Previous Post

श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल व आनंदा पवार यांचा दणदणीत विजय निश्चित!

Next Post

अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; चेन्नईत पाकिस्तानचा गेम झाला

Next Post
अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; चेन्नईत पाकिस्तानचा गेम झाला

अफगाणिस्तानचा ऐतिहासिक विजय; चेन्नईत पाकिस्तानचा गेम झाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

स्मशानभूमीतून बाहेर पडली ‘आनंदलेली’ भुतं!

August 2, 2025
‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

‘श्यामची आई’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार!

August 2, 2025
मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

मिठी नदी प्रकरणी ६५ कोटी रुपयांचा घोटाळा!

August 2, 2025
इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

इंडिगो विमानात एका पीडित व्यक्तीस सहप्रवाशाने कानशिलात लगावली!

August 2, 2025
उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

उच्चशिक्षित महिला! आठ पुरुषांसोबत लग्न!

August 2, 2025
पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

पुण्यातील यवतमधील वातावरण निवळते आहे!

August 2, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.