हवेली तालुका प्रतिनिधी | डीडी न्युज मराठी
दि.२७ ऑक्टोंबर २०२३
हवेली तालुक्यातील राजकीय दृष्ट्रा महत्वाचं समजल्या जाणा-या कोलवडी साष्टे ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणुकीसाठी जोरदार रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ हजारो जनसमुदायांच्या उपस्थित संपन्न झाला. विशेष म्हणजे, यावेळी नवमतदार व महिलांचा प्रचंड उत्साह दिसत होता.
गावात दोन पॅनल मध्ये प्रमुख्याने लढत होत आहे श्री.शहानशहावली परिवर्तन या पॅनलसाठी उमेदवार मिळत नसल्याने सत्ताधारी श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलमधील उमेदवारांना फोडून उमेदवारी देण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढली आहे. सत्ताधारी श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल आधीपासून मातब्बर पॅनल म्हणून ओळखला जात आहे. परंतु, परिवर्तन पॅनल बाहेरचे उमेदवार घेऊन तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न करेल असं सर्वांना वाटतं होतं. मात्र, काल श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलने प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने दमदार शक्तीप्रदर्शन करीत आम्हीच ताकदवान आहोत हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे परिवर्तन पॅनल फेल ठरले असून आता संकटात असल्याची चर्चा पंचक्रोशीत सुरु झाली आहे. श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलने गेल्या दहा वर्षात केलेल्या प्रचंड विकासकामांना जनतेची साथ दिली असल्याचे दिसत आहे.
श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलने ग्रामदैवत श्री.शहानशहावली बाबा व बोरमलनाथ यांना नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. याप्रसंगी श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण केले. श्री.शहानशहावली मंदिरात यशवंत सहकारी साखर कारखाना कामगार युनियचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब (काका) गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच यावेळी पॅनलचे प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक सुभाष गायकवाड (बंधु) युवा उद्योजक व हवेली तालुका शिवसेना नेते अजित गायकवाड आणि शिवसेना शाखा प्रमुख राजाराम पंढरीनाथ गायकवाड यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलला जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलची आणखी ताकद वाढली आहे. ज्या उमेदवारांनी मोठ्या मनाने उमेदवारी अर्ज माघार घेऊन श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलला पाठिंबा दिला त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी सुभाष गायकवाड, अजित गायकवाड, स्वप्निल उंद्रे, दत्तात्रेय गायकवाड, शामराव आबा शितोळे, सरपंच पदाचे उमेदवार आनंदा पवार, यशवंतचे संचालक अर्जुन आण्णा मदने, यशवंतचे माजी संचालक व माजी सरपंच तुकाराम आबा पवार यांची भाषणे झाली. टिकेला उत्तर न देता, आपल्या पुढील पाच वर्षात पाठीमागील १० वर्षासारखा विकास करायचा असल्याचे सरपंच पदाचे उमेदवार आनंदा पवार यांनी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी पॅनलचा जाहिरनामा सर्वांसमोर मांडला. त्यास नागरिकांनी प्रतिसाद दिला.
याप्रसंगी श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलचे उमेदवार योगेश सुरेश मुरकुटे, निता सोमनाथ भालसिंग,सौ. प्रियंका धनंजय शितोळे, संतोष विठोबा नितनवरे चित्रा संदीप रवळेकर, भालचंद्र ऊर्फ संतोष नाना गायकवाड, प्रशांत राजेंद्र मदने, सोनल स्वप्नील उंद्रे, निकिता भागवत खुपसे, गणेश सोपान रिकामे, पुजा उमेश गायकवाड, वर्षा बनेश नितनवरे, रविंद्र रामदास उंद्रे उपस्थित होते.
यावेळी कोलवडी साष्टे गावातील माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हा चेअरमन व सर्व पदाधिकारी, महिला भगिनी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचासन माजी चेअरमन बाजीरावआप्पा भालसिंग यांनी केले. तसेच माजी सरपंच बबन गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.