प्रतिनिधी हवेली | डीडी न्युज मराठी
मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर २०२३
कोलवडी साष्टे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जशी निवडणुक जवळ येईल तशी रणधुमाळी जोरदार सुरु झाली आहे. मात्र, सध्यातरी श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल मतदारांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नारळ, बस, रिक्षा व गॅस सिलेंडर या चिन्हांचा सर्वत्र बोलबाला दिसत आहे.
कोलवडी साष्टे हे हवेली तालुक्यातील एक महत्वाचे गाव होय. तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत या गावाला विशेष महत्व असते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत ही तुकाराम आबा पवार प्रणित श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल आणि श्री.शहानशहावली परिवर्तन पॅनल मध्ये परंपरागत लढाई ही रंतदार असते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये तुकाराम आबा पवार यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. गेल्या निवडणुकीत पवार यांच्या पॅनलने विरोधकांना मोठ्या फरकाने धोबीपछाड केले आहे. त्यामुळे यावेळेस विरोधकांना उमेदवार मिळणार की नाही अशी शंका होती. सरते शेवटी, श्री.शहानशहावली परिवर्तन पॅनलने पवार यांच्या पॅनल मधील कार्यकर्त्यांची पळवापळवी करुन उमेदवार तयार केले. परिणामी थोडीसी चुरस पाहायला मिळत आहे. अन्यथा ही लढत एकाकी झाली असती. परंतु, जनतेचा कौल घेतल्यास श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
गावात एकुण ५ वॅार्ड आहेत. त्यापैकी वॅार्ड क्रमांक १, ३, ४ व ५ श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. तर वॅार्ड क्रमांक २ हा परिवर्तन पॅनलचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, या बालेकिल्यास श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलने गेल्यावेळेस सुरुंग लावला होता. त्यामुळे यावेळेस या वॅार्डमधून ही श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचं बोलले जात आहे. तेंव्हा, सर्वच्या सर्व वॅार्डमधून सरपंच पदासह मोठ्या मताधिक्यानी श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल विजयी होईल अशी पंचक्रोशीत चर्चा आहे.
श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलने अनुभवी, अभ्यासू, तरुण आणि सर्वसमावेशक उमेदवार दिले आहेत. तसेच या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार आनंदा पवार व पॅनल प्रमुख तुकाराम आबा पवार यांचा गावात गोतावळा आणि नातेसंबंध मोठ्या प्रमाणावर आहेत. शिवाय, आनंदा पवार यांची सामाजिक, राजकीय व व्यवसायिक कारकिर्द बरीच मोठी आहे. त्यामुळे घर टु घर त्यांचा प्रत्येकाशी जवळचे संबंध आहेत. तेंव्हा, तरुण उमेदवारांची फळी व आनंदा पवार यांचे नेटवर्क याचा फायदा श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलला होत असल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या रणधुमाळीत फारच मागे पडलेला श्री.शहानशहावली परिवर्तन पॅनल नक्की किती मतांपर्यंत पोचु शकेल याची सर्वांना अत्सुकता लागली आहे. मात्र, श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलला जो काही मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे ते पाहता आता विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे.