DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

दादागिरी आणि दहशतीला जनता मतदानातून देणार उत्तर : श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल

संतापाची सुप्त लाट ही या निवडणुकीतील टर्निंग पाँईट असेल

DD News Marathi by DD News Marathi
November 3, 2023
in राजकीय
0
दादागिरी आणि दहशतीला जनता मतदानातून देणार उत्तर : श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल

प्रतिनिधी हवेली | डीडी न्युज मराठी

मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर २०२३

कोलवडी साष्टे ग्रामपंचायती निवडणुकीसाठी आज प्रचाराची सांगता झाली. श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल व श्री.शहानशहावली परिवर्तन पॅनल या दोन पॅनल मध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. श्री.शहानशहावली परिवर्तन पॅनलच्या मंडळीनी गेल्या पंधरा दिवसांत मतदारांवर केलेली दादागिरी आणि दहशत याला जनता मतदानातून उत्तर देणार असल्याचे श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलचं मत आहे. तसेच समोर पराभव दिसत असल्याने अशी कृत विरोधकांकडून होत असल्याचे श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलच्या प्रमुखांनी सांगितले. तसेच त्यास आम्ही कोणतेही उत्तर देणार नसून जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असं त्यांनी सांगितले.

श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल व श्री.शहानशहावली परिवर्तन पॅनल या दोन पॅनलमध्ये परंपरागत लढत होत आहे. यापैकी श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल हा गावातील सर्वांना सोबत घेऊन जाणा-या सर्वसमावेशक व्यक्तींचा मिळून बनलेला असून श्री.शहानशहावली परिवर्तन पॅनलमध्ये मनगटशाहीचा वापर करणारी मंडळी असल्याची गावात चर्चा आहे. पुर्वी श्री.शहानशहावली परिवर्तन पॅनलच्या हातात सत्ता होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात काही ठराविक लोकांचीच दादागिरी होती. त्यावेळी झालेला त्रास आजही जनता विसरली नसल्याचे नागरिक सांगतात. त्यांच्या दहशतीचे आणि दादागिरीचे रंजक किस्से आजही लोक आठवणीने सांगतात. या त्रासाला कंटाळून गावातील नागरिकांनी ठरवून विरोधी पॅनलला म्हणजेच श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलला त्यावेळी मतदान करुन सत्तेवर बसविलं होतं.

याच काही ठराविक लोकांच्या त्रासाला कंटाळून श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनल तयार झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांत ही परिवर्तन पॅनलकडून अनेक नागरिकांना नाहक त्रास झाला आहे. त्यामुळेच नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. नागरिक हा सगळा राग मतदानातून दाखवून देणार असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांमध्ये संतापाची असलेली हीच सुप्त लाट या निवडणुकीतील टर्निंग पाँईट असेल असं दिसतंय. श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलने लावलेले क्लेक्सची तोडफोड केली तसेच विकासकामांच्या पाट्या ही तोडण्यात आल्या. तर दुसरीकडे श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विरोधकांच्या आक्रमक टिका टिप्पणीस किंवा दादागिरीला कोणतेही उत्तर न देता अतिशय संयमाने प्रचार केला. त्यामुळे श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलची हीच गोष्ट मतदारांना ही अतिशय भावली असल्याचे दिसत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

श्री.शहानशहावली ग्रामविकास पॅनलला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद.

Next Post

सडे परिवर्तन मंडळाच्या बाजुने जनमताचा कौल.

Next Post
सडे परिवर्तन मंडळाच्या बाजुने जनमताचा कौल.

सडे परिवर्तन मंडळाच्या बाजुने जनमताचा कौल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.