राहुरी प्रतिनिधी डीडी न्युज मराठी
दि.४ नोव्हेंबर २०२३
सडे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ५ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेली प्रचाराची रणधुमाळी काल सायंकाळी थंडावली आहे. त्यामुळे जनमताचा कौल घेतल्यास सडे परिवर्तन मंडळाच्या बाजुने जनतमाचा कौल दिसून येत आहे.
सडे परिवर्तन मंडळ, हसनपीर बाबा ग्रामविकास मंडळ, ग्रामविकास मंडळ यांच्यात प्रामुख्याने लढाई होत आहे. यापैकी परिवर्तन मंडळ हा सत्ताधारी पॅनल आहे. गेल्या पाच वर्षात गावाच्या सर्वांगिण आणि परिपुर्ण विकासासाठी सडे परिवर्तन मंडळाने अतिशय मोलाचे योगदान गावासाठी दिलं आहे. दहा दिवस प्रचाराचा तोफा जोरदारपणे धडकत होत्या. मात्र, कालपासून सुरु झालेल्या आचारसंहितेमुळे प्रचार थांबला आहे.
मात्र, यावेळी जनमताचा कौल घेण्यात आला. त्यावेळी जनतेनं पुन्हा सडे परिवर्तन मंडळाच्या हाती सत्ता सोपविल्याचं दिसून येत आहे. यामध्ये सडे परिवर्तन मंडळ ६५ टक्के, हसनपीर बाबा पॅनल ६ टक्के व ग्रामविकास पॅनल २९ टक्के असा जनतेचा कौल राहणार असल्याचं दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षात परिवर्तन मंडळाने गावाचं नाव उंचावण्यासाठी केलेली सर्वोत्तम कामगिरी ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरल्याचे दिसत आहे.
सडे परिवर्तन मंडळाचे सदस्य कोरोना सारख्या महामारीत रात्रदिवस काम करीत होतो. मात्र, त्यावेळी विरोधी दोन्ही पॅनलचे सदस्य मदतीला आले नसल्याचं लोकाचं मत आहे. परिवर्तन मंडळाच्या अथक प्रयत्नातून आर.आर.पाटील ग्रामस्वच्छता अभियानाचे पारितोषिक मिळवून गावाच्या शिरपेचात तुरा रोवून गावाचं नाव उज्वल केल्याचं ही नागरीक सांगत आहेत.
थोडक्यात परिवर्तन मंडळा पुन्हा एकदा पाच वर्ष सत्तेवर येणार असल्याचं सध्या तरी स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत, एवढ मात्र नक्की आहे.