DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अजितदादांचा फोन खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांना?

तटस्थ, नाराज पदाधिकाऱ्यांना फोनवरून अजितदादांचा वादा.

DD News Marathi by DD News Marathi
March 28, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
अजितदादांचा फोन खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांना?

खडकवासला प्रतिनिधी :

दि. २८ मार्च २०२४

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अजित पवारांनी या मतदारसंघामध्ये आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात
उतरवण्याची तयारी केली आहे. असे असताना बारामती मतदारसंघातील खडकवासला मतदार संघात मात्र दादांची डोकेदुखी वाढली आहे.

खडकवासल्यामध्ये सुप्रिया सुळे फुल अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत असताना सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी पवारांचे काही मोजकेच पदाधिकारी मैदानात उतरल्याचे चित्र
पाहावयास मिळते आहे. अनेक पदाधिकारी सुनेत्रा पवार अथवा अजित पवार येतात, नेमके त्याच वेळी प्रचारात येताना दिसत नसल्याचे चित्र आहे. तसेच राष्ट्रवादीच्या
फुटीनंतर या भागातील अनेक नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्या सोबतच राहणं पसंत केलं आहे. तसेच काही जण कोणतीही भूमिका न घेता तटस्थ राहिले आहेत. त्यामुळे यामध्ये
दादांनी स्वतः लक्ष घालून नाराज आणि तटस्थ अश्या दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांवर आपले लक्ष केन्द्रित केले आहे. त्यांना फोन करून तुमची जी काही कामे असतील, ती
मार्गी लागतील असा वादा करून तटस्थ राहण्यापेक्षा आपल्याकडे येण्याचा सल्ला दिला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत यावेळी पाहायला मिळणार आहे. शरद पवार गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची तर अजित
पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जारी आता घोषित करण्यात आली असली तरी त्या
पूर्वीपासूनच निवडणुकीच्या कामाला लागल्या असल्याचे दिसून आले आहे.

मागील तीन लोकसभा निवडणुका सुप्रिया सुळे यांनी चांगल्या मताधिक्यांनी जिंकल्या होत्या पण खडकवासला मतदारसंघामध्ये त्या पिछाडीवरती असल्याचे चित्र पाहायला
मिळालं आहे. मागील दोन निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकसंध असताना आणि काँग्रेसची मोठी ताकद सुप्रिया सुळे यांच्यासोबत असतानादेखील या मतदारसंघांमध्ये सुप्रिया
सुळे यांना खूप कमी मताधिक्य मिळाले होते. ही गोष्ट ध्यानी घेऊन सुप्रिया सुळे यांनी यंदा सर्वाधिक लक्ष खडकवासला मतदारसंघावर केंद्रित केल्याचे दिसते.

खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे झंझावाती दौरे चालू आहेत. त्यामुळे अजित पवार गटामध्ये थोडीशी अस्वस्थता आहे. त्यामुळे दादांनी आपल्या विचारांचे
नसलेल्या पण तटस्थ असलेल्यांच्या भेटी घेऊन त्यांना आपल्याबरोबर घ्या, अश्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. एवढेच नव्हे तर स्वत: अजित पवार यांनी नाराज, तटस्थ
आणि दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्यांना फोन केल्याचे समजते. त्यांना मिळून, एकत्रितपणे काम करण्याची विनंतीदेखील दादा स्टाईलने केली आहे.

वारजे, धायरी, बावधन भागांतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांना यातील बहुतांश फोन केले गेले आहेत. यामध्ये माजी नगरसेवक, जिल्हा परिषद
आणि पंचायत समिती पदाधिकारी आणि सदस्य अशी मंडळी आहेत. स्वत: दादांनी फोन करून काम करण्याची विनंती केल्याने हे पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitDadaPawar#KhadakwasalaMatadarSangh#SupriyaSule
Previous Post

पवारांच्या बालेकिल्ल्यात आणखी एक धमाका होणार?

Next Post

परवानगी दिली, पण कोंडी केली; उद्धव ठाकरेंची झाली द्विधा मनःस्थिती!

Next Post
परवानगी दिली, पण कोंडी केली; उद्धव ठाकरेंची झाली द्विधा मनःस्थिती!

परवानगी दिली, पण कोंडी केली; उद्धव ठाकरेंची झाली द्विधा मनःस्थिती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

गारपीरवाडी चौधरवाडी भागांमध्ये बिबट्याच्या वावर!

June 16, 2025
‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

‘नीट’मध्ये महाराष्ट्र अव्वल!!

June 16, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण!

June 14, 2025
पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा!

June 14, 2025
होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

होस्टेलवर विमान कोसळलं पण ती वाचली! देव तारी त्याला कोण मारी?

June 14, 2025
एक चूक अन् बापलेकीचा अंत!

एक चूक अन् बापलेकीचा अंत!

June 14, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.