जीवनाला आकार देणारी प्रेरणादायी मराठी पुस्तके
प्रेरणादायी पुस्तके वाचण्याने आपला आत्मविश्वास वाढतो. हि पुस्तके फक्त मोकळे शाब्दिक ज्ञानच देत नाहीत तर काही व्यावहारिक तंत्र, मंत्र आणि विचार देखील देतात. जे विचार, तंत्र आणि मंत्र आपण वास्तविक जीवनात लागू करू शकतो. अशी प्रेरणादायी पुस्तके आपली दृष्टी विस्तृत करण्यास मदत करतात. शिवाय ही पुस्तके आपल्याला कठीण काळात, अडचणीत आपल्या मित्रासारखी मदत करतात आणि आपल्याला योग्य दिशा दाखवितात.
आता आपण हि प्रेरणादायी पुस्तके कोणती आहेत त्याची माहिती पाहूया. यामधील काही पुस्तके हि मूळची मराठी भाषेतील आहेत तर काही पुस्तके हि इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद आहेत.
१. एक होता कार्व्हर:
EkhotaCarver
लेखिका: वीणा गवाणकर
“एक होता कार्व्हर ” हे लेखिका वीणा गवाणकर लिखित मराठी साहित्यामधील एक अप्रतिम पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे अमेरिकन संशोधक जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर याचे जीवन चरित्र आहे. या पुस्तकातून लेखिकेने कार्व्हर यांच्या संपूर्ण जीवनाच, त्यांनी केलेल्या संघर्षाचं आणि त्यांच्या कार्याचं अत्यंत सुंदर शब्दांत वर्णन केले आहे.
समोर येणाऱ्या समस्यांचा सामना करत कार्व्हर यांनी कृषी आणि विज्ञान क्षेत्रात केलेले जनहिताचे काम आपण सर्वानांच एक प्रेरणा देत.
२. द अल्केमिस्ट:
The-Alchemist
लेखक: पाउलो कोएलो
मराठी अनुवाद: नितीन कोतापल्ले
“द अल्केमिस्ट ” हे पाउलो कोएल्हो यांनी लिहिलेले बेस्ट सेलर पुस्तक आहे. हे पुस्तक मूळचे पोर्तुगीज भाषेतील आहे आणि मराठी, इंग्रजी सारख्या ८० भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.
या प्रेरणादायी पुस्तकातून लेखकाने आपल्याला ‘सँटियागो’ नावाच्या मेंढपाळ मुलाची कहाणी सांगितली आहे. सँटियागोचे एक स्वप्न आहे , त्याला जगातील सर्वात मौल्यवान खजिना शोधायचा आहे. हा मेंढपाळ मुलगा त्याच्या स्वप्नांचा पाठलाग कसा करतो आणि त्याला या स्वनापूर्तीच्या प्रवासामध्ये आलेल्या अनुभवांचे अतिशय सुंदर वर्णन आपल्याला या पुस्तकात मिळेल.
आपण आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेऊन जीवनाची वाटचाल कशी करायची याची शिकवण या पुस्तकातून मिळते. सँटियागोचा त्याचा स्वप्नापर्यंतचा प्रवास हा आपल्या सर्वांचं एक प्रेरणा देतो म्हूणन आपण प्रत्येकाने हे पुस्तक वाचले पाहिजे.
३. आपण जिंकू शकता:
आपण जिंकू शकता
लेखक: शीव खेरा
“तुम्ही जिंकू शकता ” हे लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर (Motivational Speaker) शीव खेरा लिखित “यु कॅन विन (You can win) ” या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. आपण जीवनामध्ये यश कसे मिळवावे याचे अगदी सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे.
हे पुस्तक आपल्यामध्ये एक सकारत्मक दृष्टीकोन विकसित होतो. आपण आपले ध्येय कसे ठरवावे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात हे आपण या पुस्तकातून शिकू शकतो.
४. संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली:
संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली
लेखक: रॉबिन शर्मा
प्रख्यात मोटिवेशनल स्पीकर आणि लेखक रॉबिन शर्मा यांच्या “द मोंन्क हू सोल्ड हिज फरारी (The monk who sold his Ferrari)” या पुस्तकाची मराठी आवृती म्हणजे “संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली “.
या पुस्तकात लेखकाने ज्युलियन नामक एका वकिलाची कथा सांगितली आहे जो आपल्या कारकिर्दीत खूप यशस्वी झाली. पण त्याला त्याच्या आयुष्यामधील इतर गोष्टीमध्ये समतोल राखता आलेला नाही. हृदयविकाराच्या झटक्यानंतर ज्युलियन आपल्या सर्व सुखसोयींचा त्याग करून मनःशांतीच्या शोधात हिमालयात जातो.
हिमायलायमध्ये त्याला योगी भेटतात. त्या योगिनी दिलेल्या ज्ञानामुळे ज्युलियनचे जीवन अर्थपूर्ण आणि आनंदी होऊन जाते. ज्युलियनला असे काय ज्ञान मिळाले हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन हे खुप अप्रतिम आहे.
हे पुस्तक आपल्याला जीवनातील विविध पैलूंबद्दल ज्ञान देते. या पुस्तकात वर्णन केलेल्या तंत्राचा वापर केल्यास त्यांचे जीवन अधिक अर्थपूर्ण बनू शकते.
५. अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी:
अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी
लेखक: स्टीफन आर. कवी
लेखक स्टीफन आर. कवी यांचे “(द सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल ) The 7 habits of highly effective people ” हे एक अत्यंत उत्कृष्ठ असे प्रेरणदायी पुस्तक आहे. या पुस्तकाच्या आजपर्यंत लाखो प्रति विकल्या गेल्या आहेत. या पुस्तकाची मराठी आवृत्ती “अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी ” या नावाने उपलब्ध आहे.
आपण आपला दृष्टिकोन बदलून आपले जीवन कसे बदलू शकता हे या पुस्तकातून शिकता येते. या पुस्तकात अशा ७ सवयींचे वर्णन केलेले आहे ज्या प्रभावी लोकांमध्ये सामान्य आहेत. या ७ सवयी आपले चरित्र निर्माण करतात, ज्यामुळे आपण आपल्या जीवनात अधिक प्रभावी होऊ.
खाली या पुस्तकात वर्णन केलेल्या ७ सवयी खाली दिल्या आहेत:
सक्रिय व्हा.
शेवट लक्षात घेऊन सुरूवात करा.
महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या.
विन – विन (Win-Win) विचार करा.
आधी दुसऱ्यांना समजून घ्या, मग दुसरे प्रथम दुसऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा, मग त्यांनी तुम्हाला समजून घेण्याचा.
Synergize.
स्वतःच्या कौशल्यांना सुधारत रहा.
६. थिंक अँड ग्रो रिच:
थिंक अँड ग्रो रिच
लेखक: नेपोलियन हिल
“विचार करा आणि श्रीमंत व्हा ” हे पुस्तक “थिंक अँड ग्रो रिच (Think and grow rich)” या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. हे पुस्तक प्रख्यात लेखक नेपोलियन हिल यांनी लिहले आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी नेपोलियन हिल यांनी ४० पेक्षा जास्त श्रीमंत लोकांच्या विचारसरणीचा अभ्यास केला होता.
या पुस्तकातील ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण संपत्ती, आरोग्य, आनंद आणि व्यवसाय यांसारख्या जीवनातील प्रत्येक बाबतीत श्रीमंत होऊ शकतो. हे पुस्तक श्रीमंत होण्यासाठी आपले मन आणि विचार कसे नियंत्रित करावे हे शिकवते.
७. द पॉवर ऑफ युअर सुबकॉन्सियस माईंड (अंतर्मनाची ताकद):
द पॉवर ऑफ युअर सुबकॉन्सियस माईंड (अंतर्मनाची ताकद):
लेखक: डॉ. जोसेफ मर्फी
मराठी अनुवाद: सविता दामले
“द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड (The power of your subconscious mind)” हे डॉ. जोसेफ मर्फी यांचे बेस्टसेलर प्रेरणादायी पुस्तक आहे. हे पुस्तक मराठीतही उपलब्ध आहे.
या पुस्तकातून अंतर्मन (Subconscious mind) किंवा अवचेतन मन म्हणजे काय? आणि ते आपल्या जीवनाला कसे आकार देते? याचे विस्तृत ज्ञान आपल्याला मिळेल. एकदा आपण हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्यातील खरी क्षमता लक्षात येईल.
आपल्या मनाचे योग्यरीत्या प्रोग्रामिंग करून आपण आपले आयुष्य आरोग्य, वित्त, मन: शांती, करिअर इत्यादी सर्व बाबींमध्ये सुधारू शकतो. या पुस्तकात, डॉ. जोसेफ मर्फी काही व्यावहारिक आणि समजून घेण्यास सुलभ तंत्रज्ञान देतात ज्याचा निश्चितपणे तुमच्या जीवनावर चांगला परिणाम होईल.
८. द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग:
द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग
लेखक: डेव्हिड जोसेफ श्वार्त्झ
मराठी अनुवाद: प्रशांत तळणीकर
लेखक डेव्हिड जोसेफ श्वार्त्झ यांच्या “द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग (The magic of thinking big)” या पुस्तकाने बर्याच लोकांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यास सामर्थ्य दिले आहे. या मूळच्या इंग्रजी पुस्तकाची मराठी वाचकांसाठी मराठी आवृत्तीही उपलब्ध आहे.
आपले जीवन हे आपल्या विचारांमुळे कसे घडत जाते हे या पुस्तकातून सांगितले आहे. आपण आपले विचार बदलून आपले जीवन बदलू शकतो हि या पुस्तकांची शिकवण.
९. सकारात्मक विचारांचे सामर्थ्य:
सकारात्मक विचारांचे सामर्थ्य
लेखक: नॉर्मन व्हिन्सेंट पिल
मराठी अनुवाद: पुष्पा ठक्कर
लेखक नॉर्मन व्हिन्सेंट पिल यांच्या “द पॉवर पॉझिटिव्ह थिंकिंग (The power of positive thinking)” या पुस्तकाच्या आजवर लाखो प्रति जगभर विकल्या गेल्या आहेत. या प्रेरणादायी पुस्तकाचे ४० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे. याची मराठी आवृत्ती “सकारात्मक विचारांचे सामर्थ्य ” या नावाने आपलब्ध आहे.
नावाप्रमाणेच हे पुस्तक आपल्याला सकारात्मक विचारांचे सामर्थ्य दाखवून देते. सकारात्मक विचारसरणीमुळे आपले जीवन कसे बदलून जाते हे या पुस्तकातून शिकता येईल. हे पुस्तक आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही तर प्रत्येक परिस्थितीत सकारत्मक राहण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स हि देते.
आपल्या जीवनातून सर्व नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि नवीन सकारात्मक मार्गावर जाण्यासाठी आपण हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे.
१०. फोर अग्रीमेंट्स:
४ अग्रीमेंट्स
लेखक: मिग्युअल एंजल रुईझ
मराठी अनुवाद: प्रसाद ढापरे
मिग्युअल एंजल रुईझ लिखित “फोर अग्रीमेंट (Four agreements) ” हे पुस्तक १९९७ मध्ये प्रकाशित झाले होते. या पुस्तकाचे जगभरातील मराठीसह इतर ४६ भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहे. या पुस्तकात लेखक आपल्याला असे ४ नियम सांगतात जे आपल्याला एक आनंदी आणि समाधानी आयुष्य जगण्यास मदत करतील.
समाजात आपण अनेक अलिखित नियमांबरोबर राहत असतो. हे नियम समाजाने बनवलेले असतात त्यामुळे ते सर्व नियम आपल्यासाठी योग्य असतील असे नाही. पण या पुस्तकातील ४ नियम हे आपल्याला असल्या निरर्थक नियमापासून मुक्त करते.
लेखकाने सुचवलेल्या या ४ नियमांमध्ये आपले आयुष्य बदलण्याची क्षमता आहे. या नियमांमुळे आपले आयुष्य हे स्वातंत्र्य, आनंद आणि प्रेम यांनी भरून जाईल.
या पुस्तकात खालील ४ नियम सांगितलेले आहेत:
शुद्धवचन – तुमच्या शब्दांशी प्रामाणिक राहा.
कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका
धारणा बनवू नका
नेहमी सर्वोत्तमच कार्य करा
हे नियम आपले जीवन कसे बदलू शकतात आणि यानियमांचे आपल्या जीवनात कसे अनुसरण करावे हे जाणून घेण्यासाठी आपण एकदा तरी हे पुस्तक वाचले पाहिजे.