DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अजित पवारांकडून काही चुका झाल्या असतीलही, पण…विजय शिवतारेंचे अचानक(?) घूमजाव

शिवतारेंचे बंड झाले अचानक थंड!

DD News Marathi by DD News Marathi
March 30, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
अजित पवारांकडून काही चुका झाल्या असतीलही, पण…विजय शिवतारेंचे अचानक(?) घूमजाव

मुंबई प्रतिनिधी :
दि. ३० मार्च २०२४

अजित पवार महायुतीत आल्यावरसुद्धा माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील तेढ कमी व्हायचं नाव घेत नाही. त्या
पराभवाचा वचपा विजय शिवतारे काढणार का? अशा राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. मात्र, कालपर्यंत अजित पवारांची लायकी
काढणार्‍या शिवतारेंनी अचानक घूमजाव केलं आहे. पवार-शिवतारेंचे सूर जुळल्याचं आता दिसून येत आहे. विजय शिवतारेंची तलवार अखेर
म्यान झाली आहे. आता आपण बारामती लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा त्यांनी केली. महायुती आणि मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे अडचणीत येऊ नयेत म्हणून माघार घेत असल्याची सारवासारव करत शिवतारे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवतारे म्हणाले की, ”अजित पवारांच्या हाताने काही चुका झाल्याही असतील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हा
निर्णय घेत आहोत. सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणूच. साडे पाच लाख मतं पवार विरोधी असली तरी यातील एक पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी तर एक पवार आमच्याकडे आहेत. त्यामुळं ही साडेपाच लाख मतं साहजिकच अजित दादांना मिळतील.
आम्ही आणि आमचे वरिष्ठ नेते त्यांना समजावून सांगू”.

गेल्या अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे बहुतेकांच्या नजरा खिळल्या आहेत. विजय शिवतारेंच्या बारामती
मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून फेर्‍या चालू होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा आहे का? असा
सवालदेखील त्यांनी एका सभेमध्ये केला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मध्यंतरी ते ६ – ७ तास थांबले होते. त्यावेळी
एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र शिवतारे आपल्या भूमिकेवर तेव्हाही ठाम राहिले होते.

मात्र काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा राजकरणातल्या विचित्र विश्वाचा प्रत्यय आला. या बैठकीसाठी गृहमंत्री
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे एकत्र आले होते. गेल्या काही
दिवसांपासून अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली हे लक्षात घेण्याजोगे आहे. शिवतारे
यांनी अजित पवारांवर अनेकदा टीकाही केली होती. एवढं पाणी पुलाखालून वाहून गेल्यावर शिवतारेंना ही उपरती झाली आहे. राजकारणामध्ये
कधीही काहीही होऊ शकतं याचा पुनःप्रत्यय म्हणजे शिवतारेंचे हे घूमजाव आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitDadaPawar#AjitPawar#DevendraFadnavis#EkanathShinde#SunetraPawar#VijayShivtare
Previous Post

संजय राऊत म्हणजे आमचं चिलखत : सुषमा अंधारे.

Next Post

मतदानाला दांडी मारण्याचा प्लॅन केलेल्या आई-बाबांना चिमुकल्याने शिकवला धडा!

Next Post
मतदानाला दांडी मारण्याचा प्लॅन केलेल्या आई-बाबांना चिमुकल्याने शिकवला धडा!

मतदानाला दांडी मारण्याचा प्लॅन केलेल्या आई-बाबांना चिमुकल्याने शिकवला धडा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.