सांगली प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ०३ मे २०२१
जत तालुक्यातील सनमडी येथे जत मुख्य कालव्याद्वारे पोहचलेल्या पाण्याचे जलपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. बऱ्याच वर्षांपासून बंद कालव्यातून भर उन्हाळ्यात पाणी वाहू लागल्यामुळे शेतकऱ्यांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे.
या कालव्याद्वारे मायथळ कुन्नीकोनुर, उटगी, सोन्याळ, निगडी बुद्रुक, जाडरबोबलाद या गावांतून हे पाणी मंगळवेढा तालुक्यातील काही गावांना पोहचणार आहे. या भागातील शेतक-यांच्या पाण्याची वाट पाहून किती तरी पिढ्या संपल्या तरी त्यांच्या जीवनात असं शेत बांधावारुन वाहणारं पाणी पाहण्याचे स्वप्न अधुरे राहिले होते. मात्र, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून व प्रशासनाच्या पाठपुराव्यातून वरील गावातील शेतक-यांना घरी नक्कीच विकासाची गंगा येईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.