मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. ०३ मे २०२१
पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांचा जरी विजयाचा डंका वाजला आहे. मात्र, भाजप ही जवळपास ३७ टक्के मते घेऊन घराघरात पोहचला आहे. विशेष म्हणजे, सालटोरा मतदारसंघातून चंदना बाउरी यांना भाजपाने तिकिट दिले आणि त्या आमदार म्हणून विजयी झाल्या आहेत. त्यामूळे भाजपाने हे आमचे खरे अंत्योदय म्हणून मोहिम चालविली आहे.
सौ. चंदना बाउरी, वय ३०, स्वतः मोलकरीण आहेत, तर त्यांचे पती गवंडी म्हणून काम करित आहेत. दोघांची मालमत्ता ६१ हजार रुपये, कच्चे घर, ३ बकऱ्या, ३ गायी अशी संपत्ती आहे. चंदना बाउरी यांचा विजय हाच भाजप साठी आशादायी व सर्वसामान्यांमध्ये भाजपा पोहचल्याचे पश्चिम बंगालमधील द्योतक मानले जात आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सालटोरा मतदारसंघात अत्यंत गरीब घरातून आलेल्या चंदना बाउरी यांना भाजपाने तिकीट दिले आणि त्या ४१४५ मतांनी विजयी झाल्या आहेत. चंदनाजींच्या राहत असलेल्या साध्या विटांच्या घरात वीज कनेक्शनही नाही आणि आज त्या आमदार झाल्या आहेत. हाच आहे भाजपाचा अंत्योदय संकल्प म्हणून भाजप मोहिम राबवित आहे. विशेष म्हणजे, भाजपाच्या या आमदार चंदना बाउरी यांचे देशभरातील सर्वस्तरातून कौतूक होत आहे.