DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार?

शाहांच्या भेटीत काय खलबतं झाली, मनसे लोकसभा लढणार का?

DD News Marathi by DD News Marathi
April 4, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार?

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०४ एप्रिल २०२४

मनसेची भाजपशी युती होईल का? मनसेला 2 जागा मिळणार, दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन मतदारसंघांवर मनसे दावा करणार, भाजपच्या चिन्हावर मनसे निवडणूक लढवणार अशा अनेक चर्चांनी सध्या जोर धरला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे गुढीपाडवा मेळाव्यात मिळण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू आहे. राज्यातही विविध पक्षांतील नेत्यांची लोकसभेसाठी धावपळ सुरू असल्याचं दिसत आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होत आहे. मात्र, राज्यातील इतर पक्षांना सोबत घेण्याच्या बाबतीतही राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. सध्या महायुती भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची आहे. असं असलं तरीही युतीत मनसेला सहभागी करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत असे समजते. परंतु, महायुतीत मनसे सहभागी होणार का?लोकसभेसाठी उमेदवार देणार का? याबाबत अद्याप काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या सर्वांची प्रश्न उत्तरं येत्या ९ एप्रिल रोजी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे मनसेच्या वतीने सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेली एक पोस्ट आहे. ज्यामध्ये लिहिलं गेलंय, “9 एप्रिलला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय हे सांगायचंय!” त्यामुळे यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार असं सर्वांना प्रकर्षानं वाटतं आहे.

मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे दिल्लीत जाऊन भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाहांना भेटले. त्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी देखील राज ठाकरे यांनी चर्चा केली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दलचा सस्पेन्स वाढला आहे. अश्यातच आता मनसेचा गुढीपाडव्याचा टीझर लॉन्च झाल्यामुळे कुतूहल आणखी वाढलं आहे.

मनसेचा गुढीपाडवा मेळावा येत्या ९ एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. या मेळाव्यात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आपल्या भाषणातून आपली लोकसभेची भूमिका स्पष्ट करू शकतात अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने चर्चांचं पेव सगळीकडे फुटलं आहे. अनेक ठिकाणी अद्यापही उमेदवार निश्चित झालेले नाहीत. युती आणि आघाडी यांच्याबाबतही संभ्रमावस्था आहे. अशातच मनसे-भाजप युती होणार, मनसेला दोन जागा मिळणार, दक्षिण मुंबई आणि शिर्डी मतदारसंघावर मनसे दावा थोकणार, दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर रिंगणात उतरणार, भाजपच्या चिन्हावर मनसे निवडणूक लढवणार, अश्या अनेक चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

शिवाय मनसेने लोकसभा निवडणूक लढवण्याच्या बाबतीतले किंवा भाजपसोबत युतीबाबतचे कुठलेही अंदाज खोडून काढलेले नाहीत. त्यामुळे, ‘राज ठाकरेंच्या मनात दडलंय काय’ असाच प्रश्न सर्वांना पडलाय. त्यामुळे सर्वांच्या नजराआता मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे लागल्या आहेत. मनसेकडून पाडव्याच्या मेळाव्याची जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असलेल्या मेळाव्याच्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या तो भरपूर चर्चेत आहे. या टीझरच्या माध्यमातून मनसेकडून मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी खेचण्याचा प्रयत्न सुरू असून, राज ठाकरे या मेळाव्यात त्यांची लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करू शकतात. त्यामुळे साहजिकच सर्व मनसैनिकांचं लक्ष या मेळाव्याकडे लागलं आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AmitShah#Lokasabha2024#MNS#RajThakare#Shivateerth
Previous Post

अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर अवमान ठपका ठेवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार!

Next Post

मृण्मयी देशपांडेला इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका!

Next Post
मृण्मयी देशपांडेला इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका!

मृण्मयी देशपांडेला इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांची जन्म जयंती उत्साहात साजरी!

July 31, 2025

पुण्यातील पार्टी प्रकरणात पोलिस ‘ड्रग पेडलर’ च्या शोधात!

July 30, 2025
१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

July 30, 2025
एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

July 29, 2025
सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

July 29, 2025
“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

July 29, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.