DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मृण्मयी देशपांडेला इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका!

१ मे ला येणार मृण्मयी देशपांडेचा आगामी चित्रपट 'स्वरगंधर्व सुधीर फडके' आपल्या भेटीला!

DD News Marathi by DD News Marathi
April 5, 2024
in मनोरंजन, महाराष्ट्र
0
मृण्मयी देशपांडेला इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका!

पुणे प्रतिनिधी :
दि. ०५ एप्रिल २०२४

सुप्रसिद्ध संगीतकार, गायक बाबूजी अर्थात सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुनील बर्वेने या चित्रपटात सुधीर फडके यांची भूमिका साकारली आहे, तर त्यांच्या पत्नी ललिताबाई फडके यांची भूमिका ‘कट्यार काळजात घुसली’ मधील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करणार आहे. विशेष म्हणजे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मधील ललिताबाई फडके यांची ही भूमिका मृण्मयी देशपांडेला तिच्याएका रीलमुळे मिळाली, नुकताच हा रोमांचक अनुभव तिने शेअर केला आहे.

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा पोस्टर लाँच सोहळा अलीकडेच थाटामाटात पार पडला. याप्रसंगी मृण्मयीने चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी ‘राजसी मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी बोलताना सांगितलं. तिला विचारलं की, या चित्रपटाची सुरुवात एकंदरीत कशी होती? तेव्हा मृण्मयी म्हणाली, “खूप धमाल सुरुवात झाली. माझ्याबाबतीत अशी सुरुवात अनपेक्षित होती, जी याच्याआधी कधीच घडली नव्हती. मी साडी नेसून लांब केसांची वेणी घालत सहज एकेदिवशी एक रील केली होती. मी ती रील इन्स्टाग्रामवर अगदी सहजच पोस्ट केली. त्या रीलला मी गाणं वापरलं होतं बाबूजींचं.”

“ती रील पोस्ट केल्यानंतर मला योगेश देशपांडेंचा दोन दिवसांत फोन आला. मृण्मयी आम्ही तुझाच विचार करत होतो आणि त्यातच तुझी ती रील पाहिली, जी तू इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेस. आम्हाला त्यामुळे असं वाटतं की, तू ललिताबाईंच्या भूमिकेसाठी शोभून दिसशील. तुला करायला आवडेल का? नाही म्हणण्याचा अर्थातच प्रश्नच नव्हता. काहीवेळेस असं होतं की आपण काही भूमिका निवडतो आणि कधी असंही घडतं की, काही भूमिका आपल्याला निवडतात. अगदी तसंच या भूमिकेच्या बाबतीत माझ्याबरोबर झालं. भूमिकेने मला निवडलं,” असं मृण्मयी म्हणाली.

दरम्यान, सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे यांच्याव्यतिरिक्त ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात सागर तळाशीकर (ग. दि. माडगूळकर), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा) मिलिंद फाटक (राजा परांजपे), , धीरेश जोशी (वीर सावरकर), शरद पोंक्षे (डॉ. हेडगेवार) हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत (कंसात दिलेल्या) दिसणार आहेत. या चित्रपटाच्या लेखन व दिग्दर्शनाची धुरा योगेश देशपांडे यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #MrunmayiDeshpande#SudhirPhadake#Swaragandharva#SwaragandharvaSudhirPhadake
Previous Post

यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार?

Next Post

आता तीन दिवस उष्णतेची लाट…काळजी घ्या!

Next Post

आता तीन दिवस उष्णतेची लाट...काळजी घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

July 30, 2025
एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

July 29, 2025
सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

July 29, 2025
“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

July 29, 2025
गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

July 29, 2025
उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाण्यास सज्ज?

उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाण्यास सज्ज?

July 29, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.