मुंबई प्रतिनिधी :
दि. ०५ एप्रिल २०२४
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर! दोघंही सोशल मीडियावर नेहमी खूपच सक्रिय असतात. या जोडीच्या इन्स्टाग्राम रील्स नेहमीच चर्चेत असतात. हे जोडपं ट्रेडिंग गाण्यांवर भन्नाट रील्स बनवीत असतं. ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो सध्या बराच चर्चेत आहे.
या जोडप्यानं ‘नाम मनसु’ या दाक्षिणात्य गाण्यावर डान्स केला आहे. या जोडप्यानं जबरदस्त डान्स स्टेप्स करीत एकदम एनर्जेटिक परफॉर्मन्स दिला आहे. ऐश्वर्या नारकर यांनी “आम्ही ट्रेंड फॉलो करीत आठवणी गोळा करतोय,” अशी सुंदर कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओत काळ्या रंगाचा ड्रेस ऐश्वर्या यांनी परिधान केला आहे; तर अविनाश नारकर यांनी तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे.
नारकर दाम्पत्याच्या ह्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होणार्या व्हिडीओवर सध्या कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. “अविनाश सर तर जाम मज्जा करतात डान्स करताना”, “प्रत्येक क्षण कसा आनंदात जगावा हे तुमच्याकडे पाहून शिकावं”, “किती आनंद लुटता तुम्ही जीवनाचा”, “असा माणूस पाहिजे जो जीवनाचा आनंद पुरेपूर लुटतो.” अशा प्रकारच्या कमेंट्सचा वर्षाव चाहत्यांकडून या रीलवर झाला आहे. “अविनाश काका, जाम भारी, जबरदस्त एकदम…” अशी दिलखुलास कमेंट एका चहत्यानं केली आहे.
सध्या ऐश्वर्या नारकर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. आता रंजक वळणावर येऊन पोहोचलेल्या या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे; तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.