मुंबई प्रतिनिधी :
दि. ०६ एप्रिल २०२४
२०१४ मध्ये एकनाथ खडसे हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक होते. परंतु पक्षाने देवेंद्र फडणवीसांना त्यांच्याऐवजी मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे खडसे नाराज झाले. खडसे विरुद्ध
फडणवीस, असा संघर्ष तेव्हा सुरु झाला. पुढे जमीन घोटाळ्याचे आरोपही त्यांच्यावर झाले. हे सारं आत्ता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे हे पु्न्हा
एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतं आहे. शनिवारी रात्रीच ते प्रवेश करतीलअसं मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलंय हे इथे विशेषत्त्वाने नमूद
करण्याजोगे आहे.
२०१४ पक्षांतर्गत हेटाळणीमुळे आणि जमीन घोटाळ्याच्या होत असलेल्या आरोपणमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
असं असलं तरी खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अपेक्षेप्रमाणे फार काही मिळालं नाही. पक्षात ते कायम मागे राहिले. परिणामी खडसेंच्या हाती काहीच लागलं नव्हतं. या सगळ्याचा
परिपाक म्हणून आता ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याचं बोललं जातंय. शनिवारी रात्रीच त्यांचा भाजप प्रवेश होईल, असं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीत म्हटलंय.