DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

प्रशांत किशोर यांच्या विधांनांनी काँग्रेससह ‘इंडिया’ गटाचं वाढवलं टेन्शन!

म्हणाले चांगली संधी विरोधकांनी घालवली.

DD News Marathi by DD News Marathi
April 8, 2024
in राजकीय
0
प्रशांत किशोर यांच्या विधांनांनी काँग्रेससह ‘इंडिया’ गटाचं वाढवलं टेन्शन!

नवी दिल्ली प्रतिनिधी :

दि. ०८ एप्रिल २०२४

चुकीच्या निर्णयामुळे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांना जी चांगली संधी होती ती हातातून गेल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 400 पारचे लक्ष्य ठेवले असले तरी अशीही चर्चा आहे की दक्षिण भारतात पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते हे लक्ष्य गाठण्यासाठी दक्षिण भारताचे दौरे सातत्याने करत आहेत. या वातावरणातच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलेल्या या दाव्यामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे तर काँग्रेसबरोबरच इंडिया आघाडीचंही टेन्शन वाढलं आहे.

मागील काही वर्षांत दक्षिण भारतावर भाजपने विशेष लक्ष दिले आहे. पक्षाचा वेगाने विस्तार करण्याबरोबरच जाणीवपूर्वक लक्ष देऊन विविध निवडणुकांमध्ये मतांची टक्केवारी वाढविण्याकडे त्यांचा कल आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदींनी दक्षिणेत अनेकदा दौरेही केले आहेत. त्या तुलनेत काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांचे नेते फारसे दिसून आले नाहीत.

सत्तारूढ भाजपला दक्षिण आणि पूर्व भारतात जबरदस्त फायदा होणार आहे असे प्रशांत किशोर यांनी ‘पीटीआय’शी बोलताना म्हटले आहे. भाजपच्या मतांची टक्केवारी या राज्यांतील मतदारसंघांमध्ये वाढणार आहे. भाजपला प्रामुख्याने दक्षिण भारतात चांगले यश मिळू शकते.

विरोधकांकडे भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी खूप चांगली संधी होती. पण चुकीच्या निर्णयांमुळे ही संधी त्यांनी घालवली. मोठी गोष्ट ही की तेलंगणामध्ये भाजप पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहील. असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला आहे की ओडिशामध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर राहील आणि बंगालमध्येही भाजपला चांगली संधी असून तृणमूल कॉंग्रेसपेक्षा त्यांना अधिक जागा मिळतील.

भाजपच्या मतांची टक्केवारी तमिळनाडूमध्येसुद्धा दुहेरी अंकात जाईल, असे सांगताना प्रशांत किशोर म्हणाले, ओडिशा, पश्चिम बंगाल, तेंलगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि बिहारमध्ये एकूण 204 जागा असल्या तरीपण भाजपला 50 पेक्षा जास्त जागा अद्याप जिंकता आलेल्या नाहीत. 2019 च्या निवडणुकीत मिळालेल्या 47 जागांचा आकडा या निवडणुकीत पार होईल असेही भाकित त्यांनी वर्तवले.

370 जागा एकट्या भाजपला मिळणार नाहीत, असेही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले भाजपने केवळ निवडणुकीसाठी हे ध्येय निश्चित केले आहे. आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या झंझावाताच्या उल्लेखावर बोलताना ते म्हणाले, यावेळी रेड्डींना फारसे यश मिळणार नाही.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #INDIA#INDIAGroup#PMModi#PrashantKishor#SouthIndia
Previous Post

राहुल गांधींनी आता ब्रेक घेणे योग्य!

Next Post

राहुल गांधींच्या पराभवासाठी भाजप नाही तर मित्रपक्षच उतावीळ!

Next Post
राहुल गांधींच्या पराभवासाठी भाजप नाही तर मित्रपक्षच उतावीळ!

राहुल गांधींच्या पराभवासाठी भाजप नाही तर मित्रपक्षच उतावीळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.