DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी येणार बारामतीचा गड जिंकण्यासाठी?

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान यांची सभा घेण्याच्या हालचाली सुरू.

DD News Marathi by DD News Marathi
April 10, 2024
in राजकीय
0
पंतप्रधान मोदी येणार बारामतीचा गड जिंकण्यासाठी?

बारामती प्रतिनिधी :
दि. १० एप्रिल २०२४

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने दहा महिन्यांपूर्वी राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून महत्वाच्या नेत्यांना बरोबर घेऊन बाहेर पडून राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठींबा दिला. त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्रीपद घेत सत्तेत सहभागी देखील झाले. बारामती लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकण्याचा ध्यास घेतला आहे.

यासाठी महायुतीने विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची खेळी केली आहे. लोकसभा निवडणुकीत एकाच घरातील हे दोन्ही उमेदवार आहेत. ते समोरासमोर येणार असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले आहे कारण या निवडणुकीच्या निमित्ताने नणंद-भावजय समोरासमोर येणार आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, गेल्या पंचवार्षिकात भाजपने ‘ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती’ जिंकण्याचा संकल्प सोडला होता. त्या निवडणुकीत अमेठी जिंकण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले असले तरी बी फॉर बारामतीचे भाजपचे स्वप्न पूर्ण झाले नाही. खासदार सुळे यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला होता. मात्र या निवडणुकीत कांचन कुल यांना दौंड, खडकवासला विधानसभा मतदारसंघात मिळालेली मते उल्लेखनीय होती हे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊनच या लोकसभा निवडणुकीत बारामतीचा गड जिंकण्यांची पूर्ण तयारी भाजपने केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हाताशी धरत महायुतीच्या माध्यमातूम सुनेत्रा पवार यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

बारामतीची ओळख, शरद पवार यांचा बालेकिल्ला अशी आहे. आजतागायत पवार कुटुंबियांचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिलेले आहे. गेल्या काही महिन्यांपासूनच, यंदाच्या वर्षी बारामती लोकसभा मतदारसंघावर महायुतीचा झेंडा फडकाविण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. बारामतीचे दौरे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर काही नेत्यांनी देखील केले आहेत. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरविण्याची खेळी भाजपने केली असली तरी बारामतीमध्ये शरद पवार यांचे पारडे जड होऊ शकते, याची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता बारामती लोकसभा मतदारसंघात आणून त्यांची सभा आयोजित करण्याचे नियोजन केले जात आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #Baramati#Mahayuti#PMModi
Previous Post

शेलारांनी शेअर केली कविता…प्रेम ‘यांचं’ आणि ‘त्यांचं’ सेम नसतं!

Next Post

आंबेडकरी चळवळीतील मतदार राष्ट्रीय पक्षांकडेच आकर्षित!

Next Post

आंबेडकरी चळवळीतील मतदार राष्ट्रीय पक्षांकडेच आकर्षित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.