DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

केजरीवालांना आणखी एक धक्का!

दिल्लीच्या मंत्र्यांचा राजीनामा अन् आपवर आरोप, ईडीच्या कारवाईचा परिणाम!

DD News Marathi by DD News Marathi
April 11, 2024
in ताज्या बातम्या, राजकीय
0
केजरीवालांना आणखी एक धक्का!

नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर होणार्‍या आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच दिवसेंदिवस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्यांच्या पाठीमागील अडचणीचा ससेमिरा सुटतच नाहीये.

केजरीवाल यांनी आठवड्यातून पाच वेळा वकिलांना भेटण्याची कोर्टाकडे मागितलेली परवानगी कोर्टाने बुधवारी फेटाळून लावली. त्यातचदिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या राज कुमार आनंद यांनी बुधवारी आपल्या मंत्रीपदाचा त्याबरोबरच ‘आप’च्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात गेल्यापासून दिल्ली सरकार व आम आदमी पक्षामध्ये खूप काही घडते आहे. काही दिवसांपूर्वी राजकुमार आनंद यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. त्यानंतर त्यांनी आता मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे केजरीवाल व ‘आप’च्या अडचणी वाढल्या आहेत.दिल्लीत समाजकल्याण आणि कामगार मंत्री असलेल्या राज कुमार आनंद यांच्या घरी ईडीने गेल्यावर्षी ३ नोव्हेंबर रोजी छापेमारी केली होती. या छापेमारीनुसार ७ कोटींहून अधिकची सीमाशुल्काची चोरी केल्याचा आरोप आनंद यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांच्या जामीनासाठी केलेली याचिकाही कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभरात तीन धक्के केजरीवालांना सहन करावे लागले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्या प्रकरणी अटकेत आहेत.

न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांचा जामीन फेटाळलेला असला तरी, केजरीवालांनी अटकेत असताना देखील आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही. ते तुरुंगातूनच सरकार चालवत आहेत. त्यामुळे केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे अशी याचिका दिल्ली हायकोर्टमध्ये दाखल करण्यात आली होती.पण, हायकोर्टाने याचिकाकर्त्याला खडे बोल सुनावून 50 हजार रुपयांचा दंड देखील ठोठवला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AamAdamiparty#AAP#arvindkejariwal#DelhiGovernment#RajkumarSing
Previous Post

पंतप्रधान मोदींचं मोठं विधान!

Next Post

‘राज ठाकरेंनी आपली ‘ती’ भूमिका कधीही बदलली नाही!’

Next Post
‘राज ठाकरेंनी आपली ‘ती’ भूमिका कधीही बदलली नाही!’

'राज ठाकरेंनी आपली 'ती' भूमिका कधीही बदलली नाही!'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.