राहुरी प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि.०४ मे २०२१
कोरोनाच्या दुस-या टप्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राहुरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज भैय्या पानसंबळ यांच्या माध्यमातून सडे गावात २० खाटांचे नामदार प्राजक्त तनपुरे आरोग्य मंदिर हे कोव्हिड सेंटर सुरु केले आहे. प्रत्येक गावातील नागरिकांनी पुढे येऊन असे कोव्हिड सेंटर गावोगावी सुरु केली तर कोरोनावर मात करणे सहज शक्य होईल.
कोरोना विरुद्ध आपला लढा अजून तीव्र करण्यासाठी भैय्या पानसंबळ यांच्या संकल्पनेतून व नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.
दिवसेंदिवस कोरोना रुद्र रूप धारण करतोय. रुग्णांची सोय करणे स्थानिक इस्पितळांना कठीण जात आहे. कुणालाही कोरोनाची लागण झाली असता त्या रुग्णाला उपचारांची सोय करणे अत्यंत गरजेचं आहे. सडे येथील कोविड सेंटर मध्ये वीस पेशंट आहेत. रोज सकाळी नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, संध्याकाळी जेवण. पाण्याची व्यवस्था यांची काळजीपूर्वक सोय केली आहे. ही सेवा सर्व ग्रामस्थांना मोफत आहे.
याविषयी बोलताना पानसंबळ म्हणाले, सर्व ग्रामस्थ, “ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच व सरपंच आणि गावातील मान्यवर मंडळींच्या सहकार्याने हे आरोग्य मंदिर अर्थात कोव्हिड सेंटर सुरु करु शकलो. सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.”