DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“भाजपाबरोबर येण्यास शरद पवार ५० टक्के अनुकूल होते”

प्रफुल्ल पटेलांनी केलेल्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, हे...

DD News Marathi by DD News Marathi
April 11, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
“भाजपाबरोबर येण्यास शरद पवार ५० टक्के अनुकूल होते”

मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४

१९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्पा पार पडत आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी याच पार्श्वभूमीवर सुरु आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्याबाबत खळबळजनक विधान केले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”, असा दावा ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता प्रफुल्ल पटेल यांच्या या विधानावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले…
“पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आम्हाला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भात दोन सभा झाल्या. लोकांमध्ये नक्कीच सकारात्मकता दिसत आहे. या वेळी विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत. चंद्रपूरची जागा आम्ही मागच्यावेळी हरलो होतो. पण चंद्रपूरदेखील यावेळी आम्ही जिंकणार आहोत. लोकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ऐकण्यासाठी उत्कंठा पाहायला मिळते आहे. अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी नरेंद्र मोदी यांच्या दोन्ही सभांना होती. पंतप्रधान मोदी यांच्याबाबत लोकांना जिव्हाळा आहे, कारण तीन-तीन तास लोक सभा ऐकतात!”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

शरद पवार भाजपमध्ये येण्यास ५० टक्के अनुकूल होते या प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाबाबत विचारता फडणवीस म्हणाले, “मी त्यावर आता या निवडणुकीत काही बोलणार नाही. या विषयासंदर्भात मी आधीदेखील बोललो आहे. पण हे सत्य आहे”, पण हे खरे आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यात ते म्हणाले, “जेव्हा प्रश्न राजकारणाचा येतो, तेव्हा निर्णय घ्यावा लागतो. २ जुलै रोजी अजित पवारांसह आमच्या काही नेत्यांनी या सरकामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आम्ही मुंबईत शरद पवार यांना १५ आणि १६ जुलै अशा दोन वेळा भेटलो आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी त्यांना आम्ही विनंती केली. साहेब, झाले ते झाले. आमच्या निर्णयाबरोबर येण्याचे तुम्ही पसंत केले नाही. पण तुम्हाला आमची विनंती आहे की, तुम्ही आमच्याबरोबर या. कारण तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचे आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करण्याच्या बाबतीत काही कमी केली नाही. त्यानंतर पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची भेट, एका उद्योगपतीच्या घरी झाली. त्यामुळे यामधून आमची आणि त्यांची चर्चा सुरु होती असे संकेत दिसत होते आणि ते (शरद पवार) ५० टक्के तयार होते”,

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitPawar#DevendraFadnavis#Mahayuti#SharadPawar#Vidarbha
Previous Post

सई ताम्हणकरने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केली आलिशान गाडीची खरेदी!

Next Post

या लोकसभेने दाखवून दिले, ‘पुणे तिथे काय उणे’!

Next Post
या लोकसभेने दाखवून दिले, ‘पुणे तिथे काय उणे’!

या लोकसभेने दाखवून दिले, 'पुणे तिथे काय उणे'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.