DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पुणे, नागपूरमध्ये लाखोंची रक्कम जप्त!

निवडणुकीच्या तोंडावर हे घडल्याने खळबळ!

DD News Marathi by DD News Marathi
April 11, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
पुणे, नागपूरमध्ये लाखोंची रक्कम जप्त!

पुणे प्रतिनिधी :
दि. ११ एप्रिल २०२४

लोकसभा निवडणुकांचे वारे वेगात वाहू लागले आहेत. बहुतांश मतदारसंघात उमेदवारी निश्चित झाली आहे आणि उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांनी आपला प्रचार देखील सुरू केला आहे. निवडणुकीची घोषणा झालेल्या दिवसापासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना, निवडणूक प्रक्रियेशी संबधित सर्व घटकांना केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्या आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघात होणार्‍या निवडणुकीत पाच टप्प्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी महाराष्ट्रात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार आपल्या उमेदवारांच्या नावाची यादी विविध राजकीय पक्षांनी जाहीर केली आहे.

असे असले तरी काही मतदारसंघातील उमेदवारी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चार टप्प्यांत मतदान झाले होते. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. आचारसंहिता असल्या कारणाने ५० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम, रोख स्वरूपात जवळ बाळगता येत नाही.

आचारसंहिता लागू झालेली असल्याने, कारणाशिवाय अधिक रक्कम जवळ बाळगणाऱ्यांची तपासणी करून, चौकशी करून त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे. त्यातच आचारसंहिता सुरू असतानाही लाखो रूपयांची रक्कम जवळ बाळगणाऱ्यांवर पुणे, नागपूर येथे कारवाई करण्यात आली.

भरारी पथकांनी वाहनांची तपासणी करून पुणे शहर आणि जिल्हा परिसरातून सुमारे 65 लाख रूपयांची रक्कम जप्त केली. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एका खासगी गाडीची तपासणी केली असता तिच्यामध्ये13 लाख 90 हजार 500 रुपयांच्या नोटा मिळाल्या.

तर दुसऱ्या घटनेत, शहरातील कमान पुलाजवळ शिरुर पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी एका वाहनातून 51 लाख 16 हजार रुपये जप्त करण्यात आले. ही सर्व रक्कम सध्या कोषागारात ठेवण्यात आली असून याबाबत चौकशी झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

लोकसभा निवडणूक पारदर्शी आणि चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. विविध भागात भरारी पथकांची नेमणूक निवडणूक आयोगाने केली असून त्यांच्या माध्यमातून ही कारवाई केली जात आहे.

महाराष्ट्रात इतर राज्यातून प्रवेश करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात असून महाराष्ट्र गुजरात सीमेवर तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर पथके तैनात करण्यात आली आहेत.

गुजरात आणि इतर राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या चार चाकी वाहने तसेच इतर प्रवासी वाहनांची पोलीस आणि स्थिर नियंत्रण पथकाकडून कसून तपासणी केली जात आहे. निवडणूक काळात मतदारांना भुलवण्यासाठी मद्य तसेच पैशाचे आमिष दाखवले जाते.

याला आळा घालण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत कठोर पावले उचलली जात आहेत. पोलिस भरारी पथके, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नेमण्यात आली आहेत.

भरारी पथकाने नागपूर येथे देखील, पुणे शहर, जिल्ह्याप्रमाणे कारवाई करत रोकड जप्त केली. या कारवाईत एकूण 10 लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. एका स्कॉर्पिओ गाडीतून, नागपूर चंद्रपूर हायवेवर ही रक्कम जप्त करण्यात आली.

ही रक्कम कोणाची आहे आणि ती कशासाठी वापरली जाणार होती, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. जप्त करण्यात आलेल्या रकमेचा निवडणुकीशी काही संबंध आहे का? याचाही कसून शोध घेतला जात आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ElectionCommission#Nagpur#VigillencePune
Previous Post

या लोकसभेने दाखवून दिले, ‘पुणे तिथे काय उणे’!

Next Post

भाजपचे चाळीस मतदारसंघ इंडिया आघाडीच्या टार्गेटवर!

Next Post
भाजपचे चाळीस मतदारसंघ इंडिया आघाडीच्या टार्गेटवर!

भाजपचे चाळीस मतदारसंघ इंडिया आघाडीच्या टार्गेटवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.