नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १२ एप्रिल २०२४
अरविंद केजरीवाल हे मागील 22 दिवसांपासून जेलमध्ये आहेत. तरी त्यांनी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नसून त्यावरून भाजपसह नायब राज्यपालांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. मोठे षडयंत्र अरविंद केजरीवाल सरकारविरोधात रचले जात आहे असे म्हणत दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावण्याची तयारी सुरू आहे आणि नायब राज्यपालांकडून केंद्रीय गृह मंत्रालयाला आक्षेपार्ह पत्रं लिहिली जात आहेत असा आरोप आतिशी यांनी केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मागील 22 दिवसांपासून जेलमध्ये आहेत. मात्र, त्यानंतरही त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला नसल्याने त्यांना या पदावरून हटवावे, या मागणीसाठी दिल्ली हायकोर्टात तीनदा याचिका दाखल केली गेली. पण कोर्टाने या याचिका फेटाळून लावल्या. तर भाजप व नायब राज्यपाल केजरीवालांवर सातत्याने पदाचा राजीनामा न देण्यावरून टीका करत आहेत.
या संदर्भात आज मंत्री आतिशी यांनी भाजपवर आणखी एक आरोप केला आहे. यानुसार त्या म्हणाल्या, आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे की, पुढील काही दिवसांत भाजपचे केंद्र सरकार दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावणार आहे. कोणताही पुरावा नसताना आधी केजरीवालांना खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि आता लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्याचे षडयंत्र भाजप करत आहे.
कोणत्याही अधिकाऱ्यांची नियुक्ती दिल्लीत केली जात नाहीये. प्रशासनातील बदल्या बंद आहेत. अधिकाऱ्यांनी, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बैठकांना येणेही बंद केले आहे. नायब राज्यपाल मागील एक आठवड्यापासून गृह मंत्रालयाला चुकीची पत्रं लिहित आहेत. एवढेच नव्हे तर केजरीवालांच्या खासगी सचिवांनादेखील हटवण्यात आले आहे. यावरून दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे हे स्पष्ट आहे, असा आरोप आतिशी यांनी केला.
‘आप’ने आपले बहुमत, फेब्रुवारी महिन्यातच विधानसभेत सिध्द केले आहे. बहुमत असलेल्या, सत्तेत असलेल्या पक्षाला राष्ट्रपती राजवटीचा आदेश दिला जाऊ शकत नाही. अरविंद केजरीवाल यांच्याकडे विधानसभेत स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजपने दिल्लीत लावलेली राष्ट्रपती राजवट बेकायदेशीर असेल, असेही आतिशी म्हणाल्या.
दिल्लीत कोणत्याही अधिकाऱ्यांची नियुक्ती होत आहेसे दिसत नाही. प्रशासनात बदल्या होत नाहीत. अधिकाऱ्यांनी बैठकांना येणेही, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बंद केले आहे. नायब राज्यपाल गृह मंत्रालयाला मागील एक आठवड्यापासून चुकीची पत्रं लिहित आहेत. केजरीवालांच्या खासगी सचिवांना हटविले गेले आहे. या सगळ्या घडामोडींवरून दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे असे दिसते, असा आरोप आतिशी यांनी केला.